ETV Bharat / state

बच्चू कडूंचा भाजपवर 'प्रहार'; शिवसेनेला दिला पाठिंबा

प्रहार जनशक्ती पक्षाने शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री वर भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आपला जाहीर पाठिंबा दर्शवला. यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे उपस्थित होते.

आमदार बच्चू कडू यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री वर भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला आपला जाहिर पाठिंबा दर्शवला.
author img

By

Published : Oct 27, 2019, 10:19 AM IST

अमरावती - प्रहार जनशक्ती पक्षाने शिवसेनेला जाहिर पाठिंबा दिला आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री वर भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आपला जाहिर पाठिंबा दर्शवला. यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे उपस्थित होते. सध्या प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्ह्यात 2 आमदार आहेत. आधी प्रहारचे एकमेव आमदार असलेले बच्चू यांच्या प्रहार पक्षात मेळघाटाचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी निवडणूक पूर्वी प्रवेश केला होता. आता ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याने आता प्रहारचे 2 आमदार झाले आहेत.

हेही वाचा - काँग्रेसची शिवसेनेला खुली ऑफर, भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसची नवी खेळी

शेतातील पेरणी ते कापणी पर्यंतची कामे रोहयो मधून करणे, दिव्यांग आणि आदिवासी बांधवांच्या योजनांची अंमलबजावणी करणे, तसेच अचलपूर आणि मेळघाट मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या, आदिवासींच्या, शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या, दिव्यांग्य बांधवांच्या प्रश्न सोडवून त्याची पूर्तता करण्याच्या अटीवर शिवसेनेने पाठींबा दिला, असे प्रहारने दिलेल्या पाठिंब्याच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. तर आता दुसरीकडे प्रहारने शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे विदर्भात भाजपला कोंडीत पकडण्यात प्रयत्न भविष्यात होण्याची शक्यता आहे.

Intro:आमदार बच्चू कडू यांच्या प्रहारचा शिवसेनेला पाठिंबा.

पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन दिला पाठिंबा
-----------------------------------------------
अमरावती अँकर
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री वर भेट घेऊन शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे.सध्या प्रहार जनशक्ती संघटनेचे अमरावती जिह्यात दोन आमदार आहे.आधी प्रहारचे एकमेव आमदार असलेले बच्चू यांच्या प्रहार पक्षात मेळघाटाचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी निवडणूक पूर्वी प्रवेश केला होता. आता ते सुद्धा या निवडणुकीत विजयी झाल्याने आता प्रहारचे दोन आमदार झाले आहे .या दोन्ही आमदारांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे.

शेतातील पेरणी ते कापणी पर्यंतची कामे रोहयो मधून करणे, दिव्यांग आणि आदिवासी बांधवांच्या योजनांची अंमलबजावणी आणि अचलपूर व मेळघाट मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न ,सर्वसामान्य नागरिकांच्या , आदिवासींच्या, शेतकऱ्यांच्या , मजुरांच्या, दिव्यांग्य बांधवांच्या प्रश्न सोडवून त्याची पूर्तता करण्याच्या अटीवर शिवसेना पाठींबा दिला असल्याचं प्रहार ने दिलेल्या पाठिंब्याच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
---------------------------------------------Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.