ETV Bharat / state

अमरावतीत 36 केंद्रांवर होणार एमपीएससी परीक्षा; प्रशासन सज्ज - अमरावती एमपीएससी परीक्षा केंद्र

वादात सापडलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा येत्या २१ मार्चला होत आहे. त्यासाठी राज्यातील परीक्षा केंद्रांवर पूर्व तयारी सुरू आहे. अमरावतीमध्ये ३६ ठिकाणी परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

MPSC Exam Centers
एमपीएससी परीक्षा केंद्र
author img

By

Published : Mar 19, 2021, 1:06 PM IST

अमरावती - एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने 21 मार्चला परीक्षा घेतली जाणार आहे. अमरावती शहरात एकूण 36 केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार असून या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. कोरोनाचे संकट कायम असताना ही परीक्षा घेतली जात असल्यामुळे योग्य अशी काळजी घेतली जात आहे.

एमपीएससी परिक्षेसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली
जिल्ह्यात 10 हजार 837 विद्यार्थी देणार परीक्षा -शहरातील एकूण 36 शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एमपीएससीच्या परीक्षेसाठी केंद्र ठेवण्यात आली आहेत. त्याठिकाणी एकूण 10 हजार 837 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले असून सकाळी 10 ते 12 आणि दुपारी 3 ते 5 अशा दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे. अमरावतीचे निवासी जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी याबाबत माहिती दिली. परीक्षेसाठी कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी -एमपीएससीची परीक्षा घेण्यासाठी महसूल विभागातील एकूण 1 हजार 100 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोनाचे संकट पाहता या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बचत भवन येथे सलग तीन दिवस विशेष शिबीर घेऊन कोरोना चाचणी करण्यात आली. परीक्षा केंद्रांवर नियुक्त सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फेसशिल्ड, मास्क, ग्लोव्हज्, सॅनिटायझर पुरवले जाणार आहे.रविवारी एनटीपीसीचीही परीक्षा -'नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी' अर्थात एनटीपीसी ही रेल्वे भरतीची परीक्षाही रविवारी घेतली जाणार आहे. एमपीएससीची परीक्षा अगोदर 14 मार्चला होणार होती. ही परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी राज्यभर आक्रमक धोरण स्वीकारले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 21 मार्च परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. रेल्वेने एनटीपीसीची परीक्षा अगोदरच जाहीर केली असून शहरातील ऑनलाईन केंद्रांवर ही परिक्षा होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.