अमरावती - शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करणारे आमदार रवी राणा यांना अटक करून शुक्रवारी रात्री डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय या कोविड कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. त्यावर आज खासदार नवनीत राणा कार्यकर्त्यांसह आमदार राणा यांना भेटायला कारागृहात पोहचल्या. त्यांना कारागृहात आमदार राणा यांच्याशी भेटण्याची परवानगी नाकारल्याने त्यांनी कारागृहासमोरच धरणे आंदोलन सुरू केले.
खासदार नवनीत राणा यांचे कारागृहासमोर धरणे आंदोलन - आमदार रवी राणा यांना अटक
मोझरी येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात शुक्रवारी आंदोलन छेडण्यात आले. आंदोलन हिंसक मार्गावर जाण्याची लक्षणे दिसताच पोलिसांनी राणा यांच्यासह 100 जणांना अटक केली. या सगळ्यांची शुक्रवारी रात्री कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यानंतर आज खासदार नवनीत राणा आमदार पतींना भेटण्यासाठी घेल्यानंतर त्यांना अडवण्यात आले.
![खासदार नवनीत राणा यांचे कारागृहासमोर धरणे आंदोलन अमरावती](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9543421-800-9543421-1605345507442.jpg?imwidth=3840)
अमरावती
अमरावती - शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करणारे आमदार रवी राणा यांना अटक करून शुक्रवारी रात्री डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय या कोविड कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. त्यावर आज खासदार नवनीत राणा कार्यकर्त्यांसह आमदार राणा यांना भेटायला कारागृहात पोहचल्या. त्यांना कारागृहात आमदार राणा यांच्याशी भेटण्याची परवानगी नाकारल्याने त्यांनी कारागृहासमोरच धरणे आंदोलन सुरू केले.
खासदार नवनीत राणा यांचे कारागृहासमोर धरणे आंदोलन
खासदार नवनीत राणा यांचे कारागृहासमोर धरणे आंदोलन