ETV Bharat / state

Valentine Week : नवनीत राणा-रवी राणांची लव स्टोरी आहे एकदम खास, पाहा झक्कास फोटो.. - आमदार रवी राणा

दक्षिणेतील चित्रपटात अभिनयाच्या बळावर आपला आग्रा वेगळा ठसा उमटविणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची प्रेम कहाणी देखील खास आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्ताने पाहुयात लोकप्रिय आणि प्रसिध्द खासदार नवनीत राणा यांची खास लव स्टोरी.

MP Navneet Ranas love story
खासदार नवनीत राणाची लव स्टोरी
author img

By

Published : Feb 11, 2023, 10:49 PM IST

अमरावती: योग गुरु रामदेव बाबा यांच्या आश्रमात नवनीत राणा यांची पहिली भेट बडणाऱ्याचे आमदार रवी राणा यांच्यासोबत झाली होती. पहिल्याच भेटीत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. आणि रामदेव बाबा यांच्या आशीर्वादाने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. बडनेरा चे आमदार रवी राणा यांच्यासोबत 2 फेब्रुवारी 2011 रोजी त्यांनी अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर सामूहिक विवाह सोहळ्यात लग्नगाठ बांधली. या सोहळ्यात एकूण तेराशे 50 जोडप्यांचे लग्न लागले होते. या लग्न सोहळ्याला पाच लाख पाहुणे उपस्थित होते.

A couple with two children
दोन मुलांसह दाम्पत्य
Got the love of Amravatikar
अमरावतीकरांचे मिळाले प्रेम

अमरावतीकरांचे मिळाले प्रेम : आमदार रवी राणा यांच्या घरी आई-वडील यांच्यासह मोठे भाऊ वहिनी असे एकत्रित कुटुंब आहे नवनीत राणा ह्या देखील आमदार रवी राणा यांच्यावरीलप्रेमामुळे राणा कुटुंबाशी एकरूप झाल्या. अमरावतीच्या सून म्हणून पहिल्या दिवशी पासूनच नवनीत राणा यांना अमरावती करांचे प्रेम मिळाले. खरं तर नवनीत राणा यांच्याशी लग्न केल्यावर बडनेरा चे आमदार रवी राणा यांना प्रचंड बळ मिळाले. नवनीत राणा यांच्या साथीमुळेच ते बडनेरा विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा निवडून आलेत.

Initiative in social work
समाज कार्यात सहभाग

प्रेमाच्या वृक्षवेलीवर दोन फुल : आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या प्रेमाच्या वृक्षवेदीवर आरोही आणि रणवीर असे दोन अपत्य फुलाप्रमाणे बहरले. राणा दांपत्याला पहिली मुलगी झाली तेव्हा दहीहंडी सोहळ्यात तिचा नामकरण विधी आयोजित करण्यात आला होता.

Rana couple
राणा दाम्पत्य
Leader in religious work too
धार्मिक कार्यातही आघाडी

2014 मध्ये लढल्या पहिली निवडणूक : आमदार रवी राणा यांच्या विश्वासाच्या भरवशावर खासदार नवनीत राणा यादेखील सुरुवातीला सामाजिक उपक्रमात आणि नंतर थेट राजकारणात उतरल्या. 2014 मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात खासदार नवनीत राणा यांनी आपला ठसा उमटविण्यास सुरुवात केली.

Popular MP
लोकप्रिय खासदार
Initiative in social work
समाज कार्यात सहभाग

2019 च्या निवडणुकीत मिळाला विजय : 2014 च्या निवडणुकीत पराभवाला समोर गेल्यावर देखील नवनीत राणा यांनी संपूर्ण पाच वर्ष अमरावती जिल्हा अक्षरशः पिंजून काढला. मेघाटातील अति दुर्गम भागात वसलेल्या प्रत्येक गावात त्यांनी थेट संपर्क साधला. नवनीत राणा यांची प्रचंड मेहनत आणि चिकाटी पाहता अमरावती लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी त्यांना 2019 च्या निवडणुकीत मोठा विजय मिळवून दिला. सलग पाच वेळा लोकसभा निवडणूक जिंकणारे शिवसेनेचे आनंद अडसूळ यांचा नवनीत राणा यांनी पराभव केला.

With Prime Minister Modi and Home Minister Amit Shahjा
पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांसोबत

राणा दांपत्य कायम एकमेकांच्या पाठीशी :खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दाम्पत्य अमरावती जिल्ह्यासह आता संपूर्ण देशभर परिचयाचे झाले आहे. एकमेकांवर आलेल्या कुठल्याही संकटात राणादांपत्य कायम एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले आहे. आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनात खासदार नवनीत राणा यांची अतिशय महत्त्वाची भूमिका राहिली तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करण्याचे आवाहन खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना दिले असताना संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक प्रचंड चिडला असताना देखील आमदार रवी राणा यांच्या साथीमुळे खासदार नवनीत राणा आपल्या भूमिकेवर ठाम राहू शकल्या.

हेही वाचा : Valentine Week : ...म्हणूनच 'चॉकलेट डे' साजरा केला जातो, वाचा चॉकलेटचा इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.