ETV Bharat / state

Ink Thrown in Amravati : अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांवर अमानुष अत्याचार - खासदार नवनीत राणा; तर आयुक्तांनी खासदारांना भेट नाकारली - मनपा आयुक्तांवर शाईफेक नवनीत राणा प्रतिक्रिया

महापालिका आयुक्तांवर शाई फेकल्याप्रकरणी ( Ink Thrown on MNC Commissioner ) कारण नसताना आमच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. आता या प्रकरणात आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांचे नाव घ्यावे, यासाठी अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांवर राजापेठ पोलीस ठाण्यात ( Rajapeth Police Station Amaravati ) अमानुष अत्याचार केला जात आहे, असा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी केला आहे.

mp navneet rana
खासदार नवनीत राणा
author img

By

Published : Feb 12, 2022, 5:18 PM IST

अमरावती - महापालिका आयुक्तांवर शाई फेकल्याप्रकरणी ( Ink Thrown on MNC Commissioner ) कारण नसताना आमच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. आता या प्रकरणात आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांचे नाव घ्यावे, यासाठी अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांवर राजापेठ पोलीस ठाण्यात ( Rajapeth Police Station Amaravati ) अमानुष अत्याचार केला जात आहे, असा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी केला आहे. ( MP Navneet Rana visited rajapeth police station )

माध्यमांशी बोलताना खासदार नवनीत राणा

खासदार नवनीत राणा यांनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट -

अमरावती महापालिकेच्या आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकल्याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्यासह अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात एकूण पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, आज खासदार नवनीत राणा राजापेठ पोलीस ठाण्यात पोलिसांनी अटक केलेल्या कार्यकर्त्यांची विचारपूस करण्यासाठी पोहोचल्या. सुमारे तासभर पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांची भेट घेतल्यावर नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मानवाधिकार आयोगाकडे करणार तक्रार -

पोलीस कोठडीत असणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांना अमानुषपणे मारहाण केली जात आहे. प्रकरणाशी कुठलाही संबंध नसणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी जबरदस्ती या प्रकरणात अडकवले आहे. आता अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांवर शाई फेकण्याच्या प्रकरणात आमदार रवी राणा यांचा हात असल्याचे कबूल करावे यासाठी त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि चपलांनी मारहाण केली जात आहे. पोलिसांचे हे वर्तन अयोग्य असून कार्यकर्त्यांवर होत असलेल्या माणूस अत्याचाराविरोधात मानवाधिकार आयोग आणि लोकपालाकडे तक्रार करणार, असे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - अमरावती मनपा आयुक्तांवर महिलांनी केली शाईफेक; जय भवानी जय शिवाजी दिल्या घोषणा

आमदारांवर गुन्हा दाखल करण्याचा केला निषेध -

महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकण्याचा जो प्रकार झाला त्याचा मी निषेध नोंदवते. मात्र, आमदार रवी राणा यांना या प्रकरणात गोवण्यात आले असून त्यांच्यावर कलम 307 अंतर्गत दाखल करण्यात आलेले गुन्हे हे चुकीचे असून याचा निषेध नोंदविते, असे त्या म्हणाल्या. यापूर्वी देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना थप्पड मारणाऱ्या व्यक्ती विरोधातही कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल झाले नाही. मात्र, निषेधाचा भाग म्हणून महापालिका आयुक्तांवर शाई फेकला प्रकरणात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतात हे योग्य नाही. हा संपूर्ण प्रकार जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या दबावात येऊन केला जात असल्याचा आरोपही खासदार नवनीत राणा यांनी केला.

महापालिका आयुक्तांनी खासदारांना भेट नाकारली -

महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण काशीकर यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या खासदार नवनीत राणा यांना आयुक्तांनी भेट नाकारली. बराच वेळपर्यंत महापालिका आयुक्त निवासस्थानाच्या प्रवेशद्वारासमोर भेटीसाठी वाट पाहिल्यावर खासदार राणा राजापेठ पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्या.

राजापेठ पोलीस ठाण्यात कडेकोट बंदोबस्त -

खासदार नवनीत राणा पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांना भेटण्यासाठी राजापेठ पोलीस ठाण्यात येणार असल्यामुळे सकाळपासूनच या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. महापालिका आयुक्तांनी खासदार नवनीत राणा यांची भेट नाकारल्यावर खासदार राणा थेट राजापेठ पोलीस ठाण्यात पोहोचल्या. यावेळी पोलिसांनी केवळ खासदार नवनीत राणा यांनाच आतमध्ये प्रवेश दिला जाईल, अशी भूमिका घेतली. मात्र, माझ्यासोबत स्वीय सहाय्यक आहे त्यांच्याशिवाय मी आतमध्ये जाणार नाही. हवे तर पोलीस उपायुक्तांना बाहेर बोलवा, असे त्या म्हणाल्या. यानंतर पोलिसांनी नवनीत राणा यांच्यासोबत त्यांच्या स्वीय सहाय्यकासह दोन महिला कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्याच्या आत पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांना भेटण्याची परवानगी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.