ETV Bharat / state

MP Navneet Rana On Farmer Issue : शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे करा, त्यांना मदत मिळवून द्या - नवनीत राणा

MP Navneet Rana On Farmer Issue : राज्यात यंदा कमी पावसामुळं शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय. शेतातील पिकं पाण्याअभावी सुकून गेलीत. आज खासदार नवनीत राणांनी या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांची भेट घेतलीय, शेतपिकांची पाहणी केलीय.

MP Navneet Rana On Farmer Issue
खासदार नवनीत राणा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 7:10 PM IST

खासदार नवनीत राणा यांची प्रतिक्रिया

अमरावती MP Navneet Rana On Farmer Issue : राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या कमतरतेमुळं उभी पिकं जळून गेलीत आहेत. त्यामुळं शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडलाय. खासदार नवनीत राणा यांनी आज अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात येणाऱ्या आसेगाव पूर्णा परिसरातील शेतांची पाहणी केलीय. यावेळी शेतातील पिकं पाण्याअभावी खराब झालेली त्यांना आढळून आलीत. एकूणच शेती संदर्भात नेमकी काय परिस्थिती आहे, शेतकऱ्यांना काय अडचणी आहेत, याबाबत परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून खासदार नवनीत राणा यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी जाणून (lack of rain in Amravati) घेतल्या.

खासदार राणांनी केली शेतांची पाहणी : सुमारे दीड-दोन महिन्याच्या अंतरानंतर मंगळवारी रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी बरसलेल्या पावसामुळं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय. तरी एकूणच यावर्षी पावसाअभावी शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. प्रशासनानं शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालंय, त्याचे पंचनामे करून त्यांना मदत मिळवून द्यावी. यासंदर्भात मी जिल्हा प्रशासनाला आदेश देणार असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलंय. (Amravati news)

शेतीसाठी पुरेशी वीज देण्याची मागणी : आमच्या सरकारनं सलग 12 तास वीज देण्याचा निर्णय घेतलाय, असं असताना अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना वीजच मिळत नाही. त्यामुळं अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. रात्री दीड वाजता गावातील वीजपुरवठा बंद केला जातोय आणि शेतात वीजपुरवठा केला जातो. रात्री झोपमोड करून शेतकऱ्यांना शेतात पिकांना पाणी देण्यासाठी येणं, अतिशय कठीण काम आहे. वीज वितरण कंपनीनं शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करावा. या संदर्भात देखील मी संबंधित विभागासह जिल्हा प्रशासनाला आदेश देणार असल्याचं, खासदार नवनीत राणा यांनी म्हटलंय. प्रशासनाच्या वतीनं तहसीलदारांना सोबत घेऊन शेतीच्या झालेल्या नुकसानाचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल, यासाठी त्वरित पाऊल उचलावं असं देखील खासदार नवनीत राणा यांनी म्हटलंय. (Farmer Issue due to lack of rain in Amravati)

हेही वाचा :

  1. Drought In Beed District: बीड जिल्ह्यात पाऊस नसल्याने दुष्काळजन्य परिस्थिती; शेतकरी चिंतेत
  2. CM Shinde Visited Parner Taluka: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केली पारनेर तालुक्यातील शेतातील पिकांची पाहणी
  3. Water Supply by Tanker in Pune: पुणे जिल्ह्यात दुष्काळाचं सावट; उन्हाळ्याप्रमाणेच केला जातोय पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा, वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.