ETV Bharat / state

11 महिन्याच्या बाळाला विष पाजून आईचा आत्महत्येचा प्रयत्न, बाळाचा मृत्यू

author img

By

Published : Feb 24, 2020, 11:52 PM IST

सुमारे दोन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या प्रिया कुलदीप येवले (वय 23 रा. धनेगाव) या महिलेने आत्महत्या करण्याच्या हेतूने शनिवारी विषारी औषध प्राशन केले. आपल्यानंतर मुलाचे काय होणार या विचाराने तिने आपल्या कुंज या अकरा महिन्याच्या मुलाला सुद्धा विष मिश्रीत दूध पाजले.

amaravati
11 महिन्याच्या बाळाला विष पाजून आईचा आत्महत्येचा प्रयत्न, बाळाचा मृत्यू

अमरावती - 11 महिन्याच्या बाळाला विषमिश्रीत दूध पाजून आईने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. धनेगाव येथे रविवारी (दि 23) ही ह्रदयद्रावक घटना घडली. या घटनेत बाळाचा मृत्यू झाला असून आईची प्रकृती सुद्धा गंभीर आहे. बाळाच्या अंत्यविधीवेळी संपूर्ण धनेगाववासी हळहळल्याचे चित्र पाहायला मिळाले. या घटनेमुळे पंचक्रोशीत दुःख व्यक्त केले जात आहे.

सुमारे दोन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या प्रिया कुलदीप येवले (वय 23 रा. धनेगाव) या महिलेने आत्महत्या करण्याच्या हेतूने शनिवारी विषारी औषध प्राशन केले. आपल्यानंतर मुलाचे काय होणार या विचाराने तिने आपल्या कुंज या अकरा महिन्याच्या मुलाला सुद्धा विष मिश्रीत दूध पाजले. दोघांनाही रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान शनिवारी रात्री कुंजचा मृत्यू झाला. बाळाची आई प्रियाची प्रकृती सुद्धा गंभीर असून तीच्यावर अमरावती येथील एका खासगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - मुलाला हळद लागली...अन्ं पित्याने संपवले जीवन

या घटनेमुळे संपूर्ण धनेगावात शोककळा पसरली असून रविवारी अकरा महिन्याच्या गोंडस कुंजला निरोप देताना सर्व गाववासीयांच्या डोळ्यांनी अश्रूला वाट मोकळी करून दिली. प्रियाचा पती कुलदिप याचा शेतीचा व्यवसाय आहे. त्याच्याकडे संत्र्याची शेती असल्याने घरी आर्थिक संपन्नता आहे. परंतू प्रियाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला याचे नेमके कारण समजू शकले नाही. एका आईने आपल्या पोटच्या गोळ्याचा जीव का घेतला याबाबत महिलेच्या या कृत्याबाबत लोकांमध्ये चर्चा आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.