ETV Bharat / state

Mother Daughter Suicide : 'धन्यवाद, आम्हाला जगाने प्रेम दिले'; सुसाईड नोट लिहून आई आणि मुलीची आत्महत्या - Mother and daughter suicide Amravati

शिक्षक कॉलनीतल्या घरात अभियंता मुलीसह शिक्षिका असलेल्या आईचा मृतदेह गळफास (commit suicide by hanging) घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी अकराच्या सुमारास समोर आली. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Mother and daughter suicide Amravati) (Amravati Crime)

Mother And Daughter Suicide
Mother And Daughter Suicide
author img

By

Published : Oct 26, 2022, 6:57 PM IST

अमरावती : शहरात संमती शिक्षक कॉलनीतल्या घरात अभियंता मुलीसह शिक्षिका असलेल्या आईचा मृतदेह गळफास (commit suicide by hanging) घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी अकराच्या सुमारास समोर आली. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Mother and daughter suicide Amravati) (Amravati Crime)

घरात दोघीच राहायच्या - सुवर्णा प्रदीप वानखडे ( ५१ ) आणि मृणाल प्रदीप वानखडे ( २५ ) असे मृत आई व मुलीचे नाव आहे. प्रदीप वानखडे हे शिक्षक असून यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे एका शाळेत कार्यरत आहेत. ते घाटंजीला राहतात तर अमरावतीला मुलगी मृणाल व सुवर्णा या दोघीच राहत होत्या. सहा महिन्यांपूर्वीच मृणाल पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीत अभियंता म्हणून नोकरीवर लागली होती. तर सुवर्णा शहरातील एका खासगी शाळेत नोकरीवर असल्याची माहिती मिळाली आहे. शिक्षक संमती कॉलनीपासून जवळच असलेल्या हनुमान मंदिराजवळ मंगळवारी सायंकाळी एकाला सोन्याचे दागिने व काही रोकड पडल्याचे दिसले. त्यांनी ही माहिती गाडगेनगर पोलिसांना दिली.

दोघींचेही मृतदेह पंख्याला लटकलेले आढळले- पोलिसांनी घटनास्थळी येऊन रक्कम व दागिने ताब्यात घेतले. पाहणीत त्यात सोन्याच्या दागिन्यांची काही बिले आढळली. त्यामध्ये यवतमाळ येथील एक व एक बिल शहरातील विवेकानंद कॉलनीत राहणाऱ्या डॉ. आखरे यांच्या नावाचे होते. पोलिसांनी विवेकानंद कॉलनीतील आखरे यांना ही माहिती दिली. हे दागिने पाहिल्यानंतर ते दागिने सुवर्णा वानखडे यांचे असल्याचे आखरे यांनी ओळखले. आखरे हे सुवर्णा वानखडे यांचे भाऊ आहेत. हनुमान मंदिराजवळ सुमारे दीडशे ग्रॅम सोन्याचे दागिने व पावणे दोन लाख रुपये रोख होती. संशय वाढल्यामुळे पोलिस व डॉ . आखरे हे वानखडे यांच्या घरी पोहोचले. पोलिसांनी वानखडे यांच्या घराबाहेरून बरेच आवाज दिले मात्र प्रतिसाद येत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी नातेवाईकांच्या उपस्थितीत दरवाजा तोडला आणि घरात प्रवेश केला. घरातील हॉलमध्ये सुवर्णा आणि मृणाल यांचे मृतदेह दोन पंख्याला लटकलेले दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विक्रम साळी, एसीपी दत्तात्रय ढोले, गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले, पीएसआय पंकज ढोके यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाला. नागरिकांची गर्दीही जमली होती.

जवळच आढळली चिठ्ठी - घरात एका ठिकाणी पोलिसांना चिठ्ठी आढळली. त्या चिठ्ठीत इंग्रजीत लिहिले आहे की, धन्यवाद आम्हाला जगाने प्रेम दिले, तसेच मराठीत लिहिले आहे की, आमचा अंतिम संस्कार आखरे परिवार करणार. दरम्यान ही चिठ्ठी नेमकी कोणी लिहिली, याबाबत पोलिस तपास करत आहेत. दरम्यान प्रदीप वानखडे हे मंगळवारी शेगावला गेले होते. ते शेगावला का गेले होते याचे कारण समजू शकले नाही. घरात पूजेचे साहित्य व फुल तसेच पडून होते. पूजेची तयारीही दिसली. पूजेपूर्वीच ही घटना घडल्याचे दिसते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.