अमरावती - खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने शनिवारी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला. कोरोना काळातील वीज देयक माफ व्हावे, या मागणीसाठी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने यांच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा काढण्यात आला.
- इर्विन चौक येथे दुपारी 12 वाजता युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र जमले. जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणा देत हा मोर्चा इर्विन चौकातून यशोमती ठाकूर यांचे निवासस्थान असलेल्या गानेडीवाल लेआऊटकडे निघाला.
पोलिसांनी गर्ल्स हायस्कूलजवळ अडवला मोर्चा -
जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या घरावर निघालेला युवास्वाभिमानचा मोर्चा पोलिसांनी गर्ल्स हायस्कूल जवळ अडविला. रस्त्यात बॅरिकेट्स लावण्यात आल्याने मोर्चात सगभगी युवास्वाभिमानच्या कार्यकर्त्यानी पालकमंत्र्यांचा निषेध नोंदवला आणि आम्हाला पालकमंत्र्यांच्या घरी जाऊन निवेदन द्यायचं आहे, असा हट्ट पोलिसांकडे लावून धरला.
दहा जणांना पालकमंत्र्यांच्या घराकडे जाण्याची परवानगी -
आंदोलनात सहभागी केवळ दहा जणांना पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे जाण्याची परवानगी पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी दिली. जितू दुधाने यांच्यासह दहा जणांना गानेडीवाल लेआऊट परिसरात पोलिसांनी आपल्या वाहनातून नेले. पालकमंत्र्यांच्या घराकडे जाणाऱ्या मार्गावर लावण्यात आलेल्या बॅरिकेट्स जवळ आंदोलकांनी घोषणाबाजी केली. यावेळी पालकमंत्री मुंबईला असल्याने यांच्यावतीने शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले यांनी आंदोलकांचे निवेदन स्विकारले.
आशा आहेत आंदोलकांच्या मागण्या -
कोरोना लोकडाऊन काळात नागरिकांना आकरणायत आलेले अवास्तव वीज देयकात 50 टक्के सवलत देऊन गरीब, मजुरांना दिलासा द्यावा.
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आमची मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवून मागणिबाबत कॅबिनेट बैठकीत मध्ये निर्णय घ्यावा
ज्यांनी लोकडाऊन काळात संपूर्ण वीज देयक भरले आशा प्रत्येक व्यक्तीला पुढच्या देयकात त्याला 50 टक्के सवलत द्यावी.