ETV Bharat / state

अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी; नागरिकांना अनुभवला गारवा

गेल्या आठवड्यात उन्हाच्या पारा हा जवळपास ४५ अंशाच्या वर होता. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अचानक बदललेल्या वातावरणामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे तापमानामध्ये घट झाली आहे.

अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी
author img

By

Published : Jun 5, 2019, 7:29 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील दुपारच्या सुमारास आज वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेले अनेक दिवस नागरिक प्रचंड उष्णतेने हैराण झाले होते. या पावसामुळे नागरिकांना उकड्यापासून थोडा दिलासा मिळाला आहे.

गेल्या तीन चार महिन्यांपासून तसेच गेल्या आठवड्यात उन्हाच्या पारा हा जवळपास ४५ अंशाच्या वर होता. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अचानक बदललेल्या वातावरणामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे तापमानामध्ये घट झाली आहे.

अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला आणि जोरदार पाऊस पडला. वादळ वाऱ्यामुळे शहरवासियांची तारांबळ उडाली होती. महाराष्ट्राने प्रचंड उन्हाचा सामना केला. आता लवकर पाऊस दाखल व्हावा, अशी प्रार्थना आता बळीराजा करत होता, आणि आज पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे सध्यातरी बळीराजा थोडासा सुखावला आहे.

Intro:अमरावतीच्या धामणगाव तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

अमरावती -
आज अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पाऊस पडल्याने नागरिकांना गर्मीच्या उकड्यापासून थोडा दिलासा मिळाला आहे.

गेल्या तीन चार महिन्यांपासून व सर्वाधिक मागील आठवड्या पासून उन्हाच्या कडाका सहन करतानाच अचानक बदललेल्या वातावरणाने चांगलाच दिलासा मिळाला आहे. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे तापमानामध्ये घट झाली आहे.
सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास सोसाट्याचा वारा वाहायला लागला आणि जोरदार पाऊस कोसळला. वादळ वाऱ्यामुळे शहर वासियांची तारांबळ उडाली होती. महाराष्ट्राने प्रचंड उन्हाचा सामना केला. आता लवकर पाऊस दाखल व्हावा अशी प्रार्थना आता बळीराजा करीत आहेBody:अमरावतीConclusion:अमरावती

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.