ETV Bharat / state

Diwali Prasad : 'या' ठिकाणी दिवाळीच्या रात्री भाविकांना दिला जातो पैशांचा प्रसाद, 1984 पासून प्रथा सुरू

author img

By

Published : Oct 25, 2022, 7:45 PM IST

अमरावती शहपरातील काली माता मंदिरात भाविकांना चक्क पैशांच्या स्वरूपात प्रसाद देण्याची परंपरा गत 38 वर्षापासून सुरू ( Prasad of Money In Amravati Temple ) आहे. अमरावती शहरातील ( Kali Mata Temple In Amravati ) हिंदू स्मशानभूमी लगत असणाऱ्या कालीमाता मंदिरात हा पारंपारिक कार्यक्रम पार पडला. प्रसाद ( Prasad of Money Distributed in Kali Mata Temple ) मिळण्यासाठी दिवाळीच्या रात्री कालीमातेच्या मंदिरात हजारो भाविकांची गर्दी उसळली होती.

भाविकांना पैशाचा प्रसाद
Diwali Prasad

अमरावती - दिवाळीच्या रात्री मंदिरात येणाऱ्या भाविकांना चक्क पैशांच्या स्वरूपात प्रसाद देण्याची परंपरा काली मात मंदिरात गत 38 वर्षापासून सुरू ( Prasad of Money In Amravati Temple ) आहे. अमरावती शहरातील ( Kali Mata Temple In Amravati ) हिंदू स्मशानभूमी लगत असणाऱ्या कालीमाता मंदिरात हा पारंपारिक कार्यक्रम पार पडला. प्रसाद ( Prasad of Money Distributed in Kali Mata Temple ) मिळण्यासाठी दिवाळीच्या रात्री कालीमातेच्या मंदिरात हजारो भाविकांची गर्दी उसळली होती.

भाविकांना पैशाचा प्रसाद

प्रसाद देता बरकत - दिवाळीच्या पर्वावर काली माता मंदिरात भाविकांना मंदिराचे मुख्य पुजारी शक्ति महाराज यांच्या वतीने लाह्यांचा एका मोठ्या भांड्यात ठेवलेल्या लाह्या बत्तासांसोबत दहा रुपयाच्या नव्या कोऱ्या नोटा वितरित केला जातात. भाविकांना एक-दोन किंवा त्यापेक्षा अधिक नोटा प्रसादास स्वरूपात मिळतात. पैशांचा हा प्रसाद आयुष्यात बरकत अर्थात समृद्धी आणतो अशी श्रद्धा आहे. पैशांच्या प्रसाद वितरण 16 हा बरकत नावाने प्रचलित आहे. यावर्षी बरकतची हे 38 वे वर्ष असल्याचे शक्ती महाराज 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले.

1984 पासून सुरु झाली प्रथा - अमरावती शहरातील मुख्य हिंदू स्मशानभूमी परिसरात अनेक वर्ष जुने काली माता मंदिर आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार 35 ते 40 वर्षांपूर्वी करण्यात आला. या मंदिरातील मुख्य पुजारी शक्ति महाराज यांनी 1984 मध्ये दिवाळीच्या रात्री बरकत अर्थात पैशांचा प्रसाद वितरित करण्याची प्रथा सुरू केली. काली मातेने आपल्याला साक्षात्कार दिल्यामुळेच दिवाळीच्या पर्वावर रात्री मंदिरात येणाऱ्या भाविकांना पैशांचा प्रसाद वितरित केला जातो असे शक्ती महाराज यांनी सांगितले.

रात्री दोन वाजेपर्यंत गर्दी - दिवाळीला घरी लक्ष्मीपूजन केल्यावर रात्री दहा वाजल्यापासून भाविकांची गर्दी कालीमाता मंदिरात उसळते. रात्री अकरा वाजल्यापासून मंदिरात पैशांचा प्रसाद वितरित केला जातो. दिवाळीच्या रात्री दोन वाजेपर्यंत मंदिरात बरकत मिळवण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. सोमवारी रात्री मंदिर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील लावण्यात आला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.