ETV Bharat / state

'लोकांच्या तक्रारी आल्या तर तिथेच चोपणार'

मला आता लोकांच्या तक्रारी आल्या तर तिथेच मार देणार? अशी धमकी वजा इशाराच राणांनी अभियंत्याला दिला. यामुळे बैठकीत एकच खळबळ उडाली. आमदार रवी राणा एवढ्यावरच थांबले नाही, त्यांनी बैठकीदरम्यान त्या अभियंत्याला चक्क जमिनीवर बसवले आणि त्याला शिवीगाळही केली.

MLA Ravi Rana scolded engineers in a meeting over water issues
लोकांच्या तक्रारी आल्या तर तिथेच मार देणार.., आमदार राणांची अभियंत्याला भर बैठकीत शिवीगाळ
author img

By

Published : May 26, 2020, 8:54 PM IST

अमरावती - भातकुली व बडनेरा तालुक्यातील अनेक गावामध्ये सध्या पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये अधिकारी हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप करत बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी शाखा अभियंत्याला चांगलेच खडे बोल सुनावले. आज (मंगळवार) घेतलेल्या पाणीटंचाईच्या बैठकीत त्यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला. मला आता लोकांच्या तक्रारी आल्या तर तिथेच मार देणार? अशी धमकी वजा इशाराच राणांनी अभियंत्याला दिला. यामुळे बैठकीत एकच खळबळ उडाली. आमदार रवी राणा एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी बैठकीदरम्यान त्या अभियंत्याला चक्क जमिनीवर बसवले आणि त्याला शिवीगाळही केली.

आमदार रवी राणा अभियंत्याला शिवीगाळ करताना....

आमदार रवी राणा यांनी आज महानगरपालिका, जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली होती. कुठल्याच परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिक पाण्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी दक्ष राहावे, हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम आमदार रवी राणा यांनी भरला. भर बैठकीत त्यांनी शाखा अभियंता पुरोहित यांना लोकांच्या तक्रारी आल्यास तिथेच मार देणार, अशी धमकी दिली. तसेच त्यांनी बैठक संपेपर्यंत पुरोहित यांना जमिनीवर बसवून शिवीगाळही केली.

दरम्यान, राणा यांच्या या कृतीवर जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी राणा यांच्या कृत्याचे समर्थन केले आहे. तर काहींनी राणांचे वागणे बरे नव्हे, असे म्हटले आहे.

हेही वाचा - रमजान ईदच्या दिवशीही त्याने रुग्ण सेवेला दिले प्राधान्य

हेही वाचा - बच्चू कडूंनी केले दिवंगत कार्यकर्त्याच्या मुलीचे कन्यादान, पार पाडले पित्याचे कर्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.