ETV Bharat / state

MLA Nitin Deshmukh March : झेडपी सदस्य दातकरांच्या अपात्रतेवरुन आमदार देशमुख आक्रमक, प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला सज्जड दम - आमदार नितीन देशमुख मोर्चा

MLA Nitin Deshmukh March : अकोला जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर (Gopal Datkar) यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून अपात्र ठरविले. या विरोधात अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचा मोर्चा आज अमरावतीत विभागीय आयुक्त कार्यालयावर काढला. यावेळी गैरप्रकार करणारा कुठलाही अधिकारी असो तो ईडीचा किंवा सीबीआयचा जरी असला तरी त्याला आम्ही आता पाहूनच घेऊ, असा इशारा आमदार नितीन देशमुख यांनी दिला आहे.

MLA Nitin Deshmukh March
आमदार नितीन देशमुख
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 9, 2023, 7:20 PM IST

Updated : Oct 9, 2023, 7:37 PM IST

आमदार नितीन देशमुख यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांना तंबी

अमरावती MLA Nitin Deshmukh March : अकोला जिल्हा परिषदेत उद्धव ठाकरे गटाचे सदस्य गोपाल दातकर यांच्या हिंगणी बुद्रुक येथील शेतातून जाणाऱ्या रस्त्या संदर्भात गावातील एका व्यक्तीने जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर तहसीलदारांनी पंचनामा करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात सुनावणी घेऊन विभागीय आयुक्तांकडे गोपाल दातकर यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व अपात्रतेचा प्रस्ताव पाठविला. 21 जुलैला पाठविलेल्या या प्रस्तावावर विभागीय आयुक्तालयातून दुसऱ्याच दिवशी हा प्रस्ताव नियमबाह्य असल्याचे कारण देऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे परत पाठवण्यात आला होता. असं असताना 25 जुलैला विभागीय आयुक्तांनी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे देखील पाठवला. कोणत्याही जिल्हा परिषद सदस्यविरुद्ध तो गैरप्रकार करीत असेल किंवा कर्तव्य बजावण्यास सक्षम नसेल तर जिल्हा परिषद अधिनियम कलम 39 नुसार त्याला अपात्र करता येते. त्यासाठी सभागृहात उपस्थित सदस्यांपैकी दोन तृतीयांश सदस्यांनी अपात्र करण्याची शिफारस करणारा ठराव मंजूर करणे आवश्यक आहे. त्यानंतर असा ठराव शासनाकडे पाठविला जातो. मात्र गोपाल दातकर यांच्या प्रकरणात या नियमाचे पालन झाले नाही असं आमदार नितीन देशमुख म्हणाले.

विभागीय आयुक्तांशी दोन तास चर्चा : गोपाल दातकर यांच्या विरोधात त्यांच्या हिंगणी बुद्रुक गावातील एका व्यक्तीने राजकीय हेतूने तक्रार केली. यानंतर त्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन त्यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तालयात अधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठविला. पुढे अकोल्यातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष उफाळून आला. राजकीय द्वेषबुद्धीने गोपाल दातकर यांच्यावर झालेल्या कारवाईसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असल्याचा आरोप करत आज आमदार नितीन देशमुख शेकडो कार्यकर्त्यांसह विभागीय आयुक्तालयात पोहोचले. या विषयावर विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे यांच्यासोबत आमदार नितीन देशमुख यांनी सुमारे दोन तास चर्चा केली. गोपाल दातकर यांच्यावर झालेली कारवाई अयोग्य असल्याचे विभागीय आयुक्तांनी देखील मान्य केले, असे आमदार नितीन देशमुख पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

उपायुक्त कावडे यांच्यावर रोष : गोपाल दातकर यांच्या संदर्भात अपात्रतेची कारवाई करता येऊ शकत नाही, असे विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले असताना आणि त्या संदर्भात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाने पुन्हा कुठलेही पत्र विभागीय आयुक्त कार्यालयात पाठवलेले नाही. तरी देखील उपायुक्त कावडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावात आमच्या शिवसैनिकाचे जिल्हा परिषद सदस्यत्व अपात्र करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याचे आज विभागीय आयुक्तांनी केलेल्या चर्चेदरम्यान समोर आल्याचे नितीन देशमुख म्हणाले. उपमुख्यमंत्री असो किंवा मुख्यमंत्री, शासनाच्या दबावाखाली अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा असा गैरवापर करू नये. यापुढे असा प्रकार आमच्या संदर्भात घडला तर कोणत्याही विभागाचा कोणताही अधिकारी असो त्याला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा देखील यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी दिला. विभागीय आयुक्तांनी उपायुक्त कवाडे यांच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे. आठ दिवसात कारवाई झाली नाही तर विभागीय आयुक्तालयासमोर आंदोलन केले जाईल, असे देखील आमदार नितीन देशमुख म्हणाले.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांचा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. यामुळे विभागीय आयुक्तालयासमोरील जुन्या महामार्गावरील वाहतूक एका दिशेने बंद करण्यात आली होती. शिवसैनिकांना मुख्य द्वारावरच अडवण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्तालयासह परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.

हेही वाचा:

  1. Assembly Elections 2023 Dates : पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं, कोणत्या राज्यात कधी मतदान, वाचा सविस्तर
  2. USA in Support of Israel : हमास इस्रायल युद्ध आणखी भडकणार! अमेरिकेची इस्रायलला 'ही' मोठी मदत
  3. Raj Thackeray on Toll Plaza : राज ठाकरेंचे पुन्हा लाव रे तो व्हिडिओ, टोल नाक्यांवरून राज्य सरकारला दिला 'हा' इशारा

Last Updated : Oct 9, 2023, 7:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.