अमरावती : आपल्याकडे मुंबई व पुणे येथे सदनिका व कारखाने असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे सदर सदनिका व कारखाने आपल्या ताब्यात देण्यात येवून आपल्यावर कारवाई करावी अशी आपली मागणी आहे. आपल्याकडे बेहिशेबी मालमत्ता असतांना आपण गाडीत डिझेल कुठून टाकतो असा प्रश्न अधिकाऱ्यांनी आपणास विचारला. परंतु, आपण गुवाहाटी येथे जाण्यासाठी चार्टर्ड प्लेनचा वापर कसा केला याचा प्रश्न त्यांनी केला नाही, याबाबत आमदार देशमुख यांनी आश्चर्य व्यक्त केले. आमदार नितीन देशमुख यांची आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुमारे तीन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर देशमुख प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सर्वांच्या पाठीशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : विरोधी पक्षातील लोकांच्या विरोधात जाणीवपूर्वक मोहीम : इडी, सीबीआय, एसीबी, या तपास संस्थांच्या माध्यमातून मराठी लोकांनाच लक्ष्य केले जात आहे. आत्तापर्यंत २४ मराठी माणसांवर कारवाई झाली आहे. नाहीतर त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. विरोधी पक्षातील लोकांच्या विरोधात सत्ताधारी नेत्यांनी जाणीवपूर्वक मोहीम उघडल्याचे दिसून येत आहे. तसेच, आरोप करणाऱ्यांमध्ये निवडक हिंदी भाषिक लोक आहेत. राणा दाम्पत्य, किरीट सोमय्या, मोहित कंबोज यासारखे लोक चुकीचे आरोप करीत सुटले आहेत. या सर्वांच्या पाठीशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. हे त्यांचेच कारस्थान आहे, असा आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे.
मराठी लोलांवर आघात : भाजप काही विशिष्ट लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठी लोकांवर आघात करत आहे. आतापर्यंत आनंदराव अडसूळ, शरद पवार, अनिल देशमुख, छगन भुजबळ, अनिल परब, संजय राऊत, वैभव नाईक, राजन साळवी, भावना गवळी, अजीत पवार, किशोर पेडणेकर, अविनाश भोसले, मराठी व्यावसायिक, जेमिनी जाधव, यशवंत जाधव, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सचिन जोशी लोकांना ईडीने नोटीस दिली आहे. आमदार संतोष बांगर यांना देखील धमकावून शिंदे गटात आणले आहे. खासदार प्रतापराव जाधव, खासदार हेमंत पाटील यांना देखील नोटीस देण्यात आली. सुषमा अंधारे यांना घातपाताचा धमकी दिली होती. २४ जणांना नोटीस देण्यात आली. ही सर्व मराठी आहेत. परंतु, यातील शिंदे व भाजपात गेलेल्यांची चौकशी झाली नाही. कारवाई देखील करण्यात आली नाही. त्यांना पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे असही देशमुख यावेळी म्हणाले आहेत.
भाजपचे अमराठी नेते टार्गेट करतात : अमराठी असणारे भाजपचे किरीट सोमैया, मोहीत कंबोज, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, परमवीर सिंग ही माणसे आरोप करीत असून, याचे मुख्य सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहेत असा थेट आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे. भाजप व शिवसेना (२०१९)मध्ये युतीत असल्याने भाजप विदर्भात २८ जागेवर विजयी झाली आहे. शिवसेना सोबत नसती तर ५ ते १० जागेवर विजय मिळाला असता. यातील भाजपच्या १३ जागा १० हजार मताच्या फरकाने जिंकल्या आहेत. ७ जागा या ५ हजार मताच्या फरकाने निवडून आल्या. यात गोवर्धन शर्मा, मूर्तीजापुर हरीश पिंपळे, यवतमाळ येरोवार, मोहन मते, विवेक कुंभारे, आर्वीचे संदीप धुर्वे, श्वेता महल्ले, अकोट प्रकाश भारसाकळे, धामणगांव रेल्वे, अडसड, वर्धा पंकज भोयर, चिमूर बंटी, राळेगांव अशोक उके, उमरखेडचे आमदार यांचा समावेश आहे असही ते म्हणाले आहेत.
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा आदर करतो : मराठी माणूस खवळलेला आहे. मराठी माणूस चिडलेला आहे. तो २०२४ मध्ये याचे उत्तर देणार असल्याचे नितीन देशमुख यावेळी म्हणाले आहेत. आमदार रवी राणा राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर जिंकले आहेत. राणा यांची स्वतंत्र ओळख नाही. खासदार राणांमुळे ते निवडून आले आहेत. राणांकडे एवढी संपत्ती कुठून आली याची चौकशी झाली पाहिजे असेही नितीन देशमुख म्हणाले आहेत. टपोरी लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका अशी सूचना करीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील टिका आम्ही सहन करणार नाही. आम्ही पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा आदर करतो. परंतु, यापुढे त्यांच्या कुटूंबाद्दल बोलू असेही ते म्हणाले आहेत. पोलीस दबावात आहेत. त्यामुळे तक्रारदाराची माहीती घेण्यासाठी आपण न्यायालयात जाणार असल्याचेही देशमुख यावेळी म्हणाले आहेत.
हेही वाचा : Shivsena Symbol Case : धनुष्यबाण चिन्हावर निर्णय नाहीचं, पुढील सुनावणी 20 जानेवारीला