अमरावती - विदर्भासह संपूर्ण राज्यात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. अशातच राज्यमंत्री बच्चू कडू व त्यांच्या पत्नी प्राध्यापक डॉ. नयन कडू यांनी देखील आपल्या कुरळपूर्णा येथील शेतात बैलजोडीच्या सहायाने पेरणीचा श्री गणेशा केला. यावेळी कडू दाम्पत्याने वर्षभर राब राब राबणाऱ्या बैलाचे व तिफणीचे विधिवत पूजनही केले. 'या संपूर्ण जगाला चालवणारा हा शेतकरी आहे. जोपर्यंत शेतकरी शेतात चालत नाही, तोपर्यंत त्याच्या शिवाय जग चालूच शकत नाही, हे तिवार सत्य आहे. अशा असतानाही सरकार शेतकऱ्यांकडे अंध डोळ्यांनी पाहत असते', अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
'पेट्रोलप्रमाणे शेतमालांचे हमीभाव वाढत नाही' -
कोरोनामुळे आधीच सगळे संकटात सापडले आहे. अशातच सततच्या लाँकडाऊनमुळे खते, बियाणेदेखील उपलब्ध होतील की नाही, अशी शंका असतानाच लॉकडाऊन शिथील झाले आणि शेतकऱ्यांमध्ये पेरणीसाठी उत्साह संचारला. मात्र, स्वतः राज्यमंत्री बच्चू कडूदेखील आपल्यासोबत शेतात पेरणी करणार हे बघून शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. दरम्यान, ज्या प्रमाणे डिझेल-पेट्रोलच्या किंमती व वाढल्या. त्या प्रमाणात शेतमालांचे हमीभाव वाढले नाही, अशी टीकाही बच्चू कडू यांनी केली.
हेही वाचा - धक्कादायक! 'इंस्टाग्राम'वर व्हिडिओ पोस्ट करून तरुणीची आत्महत्या, लातूरमधील घटना