ETV Bharat / state

मंत्र्यांनाही शिक्षण विभाग जुमानत नाही तिथे सामान्यांचे काय?; बच्चू कडुंनी मागितली माफी - Maharshi Public School Amravati

बच्चू कडू यांच्या नाविन्यपूर्ण आंदोलनाची दखल मुंबई पासून दिल्ली पर्यत दिल्लीपासून ते पंतप्रधान मोदींच्या गुजरात पर्यंत घेतली गेली. सर्वसामान्य नागरिक, दिव्यांग, शेतकरी, शेतमजुरांसह अन्य घटकांसाठी झटणारा सर्वसामान्यांचा हक्काचा नेता म्हणून राज्यात ओळख असलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू
राज्यमंत्री बच्चू कडू
author img

By

Published : Oct 14, 2021, 10:31 AM IST

अमरावती - महाराष्ट्राच्या राजकारणात आक्रमक असलेले बच्चू कडू यांनी अनोख्या आंदोलनाने पूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीला घाम फोडला. तर कधी भाजपालाही नाकीनऊ आणले. बच्चू कडू यांच्या नाविन्यपूर्ण आंदोलनाची दखल मुंबई पासून दिल्ली पर्यत दिल्लीपासून ते पंतप्रधान मोदींच्या गुजरात पर्यंत घेतली गेली. सर्वसामान्य नागरिक, दिव्यांग, शेतकरी, शेतमजुरांसह अन्य घटकांसाठी झटणारा सर्वसामान्यांचा हक्काचा नेता म्हणून राज्यात ओळख असलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली आहे.

मंत्र्यांनाही शिक्षण विभाग जुमानत नाही तिथे सामान्यांचे काय?

दोन महिन्यांपूर्वी अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कूलमध्ये वर्ग दहावीत शिकणाऱ्या आदित्य काळमेघ या हुशार विद्यार्थ्यांने परिस्थिती अभावी शाळेची फी भरली नाही. म्हणून त्याला दहावीत केवळ 52 टक्के गुण टाकून त्याचे शैक्षणिक नुकसान केले आहे. याची गंभीर दखल शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांनी घेतली होती. तसेच चौकशी करून या शाळेवर कारवाईचे आदेश दिले होते. परंतु दोन महिने उलटूनही शाळेवर शिक्षण विभागाने कुठलीच कारवाई केली नसल्याने आदित्य काळमेघ याने उपोषण सुद्धा केले. दरम्यान ज्या खात्याचे बच्चू कडू शिक्षण राज्यमंत्री आहे त्या खात्यातील अधिकारीही बच्चू कडू यांच्या कठोर भूमिकेला व आदेशाही जुमानत नसल्याची खंत स्वतःहा बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मंत्र्यांचेच जर शिक्षण विभाग ऐकत नसेल तर तिथ सर्वसामान्य जनतेचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बैठकीत झाला मोठा राडा -

जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. बुधवारी निवासी जिल्हाधिकारी यांच्या कक्षात बैठक सुरू असतानाच भाजप, मनसे व शाळा व्यवस्थापन समितीच्या लोकांमध्ये जोरदार राडा झाला. दरम्यान या विद्यार्थ्याला न्याय देऊन शाळेवर कारवाई करणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी यांनी दिली. दरम्यान आमचे शिक्षण विभागही जुमानत नसल्याची खंत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली असून त्यांनी माफी मागितली आहे. दरम्यान या शाळेवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पुन्हा शिक्षण विभागाला दिले आहेत.

काय आहे प्रकरण -

दहावीच्या वर्षाचे पूर्ण शुल्क शाळेत भरले नाही म्हणून, दहावीत शिक्षण घेणाऱ्या आदित्य काळमेघ या विद्यार्थ्याला केवळ मूल्यांकनाच्या आधारे ५२% टक्के मार्क मिळाले आहेत. यावर पालक आणि विद्यार्थ्याने आपली खंत व्यक्त केली आहे. हा प्रकार अमरावती येथील पब्लिक महर्षी स्कुलमध्ये समोर आला होता. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चौसाळा गावातील सामान्य कुटूंबातील आदित्य अविनाश काळमेघ ही विद्यार्थी यंदा अमरावतीच्या नामांकित अशा महर्षी पब्लिक स्कुलमध्ये दहावीला होता. त्यासाठी शाळेचे शुल्क 31 हजार रूपये भरणे गरजेचे होते. पण, कोरोनामुळे आदित्यच्या वडिलांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे ते शुल्क भरू शकले नाहीत. परंतु जुळवा-जुळव करून त्यांनी 2300 रुपये परीक्षा फी भरली होती. परंतु, शाळेची पुर्ण फी न भरल्यामुळे या विद्यार्थ्याच्या टक्केवारीत मोठी कपात करून केवळ आकसापोटी या शाळेने केवळ ५२ टक्के मार्क दिल्याचा आरोप या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे.

मुद्दामहुन केवळ 52% टके गुण टाकले -

आदित्य हा पाचवीपासून अमरावती शहरातील महर्षी पब्लिक स्कुल या शाळेत शिकत होता. दरवर्षी त्याच्या पालकांनी शाळेची पूर्ण फीही भरली आहे. मात्र, कोरोनामुळे त्यांना फी भरणे कठीण झाले आहे. आदित्यला वर्ग सातवीत ८१%, वर्ग आठवीत 83% तर, वर्ग नववीत 81% टक्के गुण मिळाले असताना, आता दहावीत फक्त 52% गुण आमच्या मुलाला कसे असा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. या वर्षी मूल्यांकन पद्धतीने दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लावण्यात आला आहे. त्यामुळे यंदा प्रथमच विद्यार्थ्यांना सर्वाधिक टक्केवारी देखील मिळाली आहे. असे, असताना आदित्यला मुद्दामहुन केवळ 52% टके गुण टाकल्याचा अजब प्रकार अमरावती शहरातील या पब्लीक स्कुलने केल्याचा आरोप पालकांनी आणि मुलांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.