अमरावती - 'कोरोनामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. रुग्ण आणि त्याचे नातेवाईक संकटात आहेत. त्यासाठी आपण हे कोविड केअर सेंटर उभारले आहेत. त्यामुळे आता तुम्ही सगळ्यांनी येथे प्रमाणिकपणे काम करा. कोणाकडूनही पैसे घेऊ नका', असे आवाहन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे. ते अचलपूर येथे उभारलेल्या कोविड सेंटरच्या उद्घाटनानंतर कर्मचाऱ्यांशी बोलत होते. अचलपूर तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून ७० खाटांचे मोफत उपचार देणारे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. आज त्याचे उद्घाटन करण्यात आले. ऑक्सिजन वगळता सर्व वैद्यकीय सुविधा या सेंटरमध्ये रुग्णांना दिल्या जाणार आहे.
बच्चू कडू देणार सेवा
'अचलपूरमध्ये उभारण्यात आलेल्या या कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टरांनी सेवा द्यावी. मी पण या सेंटरमध्ये सेवा देणारे आहे', असे बच्चू कडू म्हणाले.
'बुद्ध जयंतीला चांदुर बाजार येथे सुरू करणार कोविड केअर सेंटर'
'ज्याप्रमाणे अचलपूर येथील गरज लक्षात घेता येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. त्याच धर्तीवर बुद्ध जयंतीला चांदुर बाजार येथे असेच कोविड केअर सेंटर उभारणार आहे', असेही राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.
हेही वाचा - पोलीस अधिकाऱ्याने वृद्ध महिलेचा भाजीपाला फेकला रसत्यावर; व्हिडिओ व्हायरल