अमरावती - केंद्र सरकारने लागू केलेले कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदीं(PM Narendra Modi)नी आज मागे (Farm laws repealed) घेतले आहे. त्यामुळे हा शेतकऱ्यांचा एकजुटीचा विजय झाला आहे. मोदी सरकारला हे कायदे मागे घेण्यास शेतकऱ्यांनी भाग पाडले आहे. त्यामुळे मोदींची तानाशाही शेतकऱ्यांच्या एकजुटीने मोडून काढली, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू (minister bacchu kadu) यांनी दिली आहे.
'बलिदानानंतरचा विजय'
मागील वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे तीनही कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मोदींनी हे तीन कायदे मागे घेतले आहेत. त्याची घोषणा त्यांनी केली. हा शेतकऱ्यांचा विजय आहे. त्यांच्या बलिदानानंतर त्यांचा विजय झाला आहे, असेही कडू म्हणाले.
'सर्वाधिक काळ चालणारे आंदोलन'
सर्वाधिक काळ चालणारे हे जगातील पहिले आंदोलन आहे. खासकरून पंजाबच्या शेतकऱ्यांचे मी अभिनंदन करतो. मीसुद्धा या आंदोलनात दुचाकीने सामील झालो होतो. अखेर शेतकऱ्यांचा विजय झाला आहे, असे कडू म्हणाले.