अमरावती - देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशात परराज्यातून कामासाठी आलेल्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. हाताला काम नसल्याने दोन वेळच्या जेवणाचा मोठा प्रश्न या कामगारांच्या समोर उभा ठाकला आहे.
उपासमारीने अस्वस्थ झाल्याने अनेक कामगार पायीच आपल्या गावाची वाट धरत आहेत. हीच वेळ अमरावतीतील काही कामगारांवर आली आहे. उत्तर प्रदेशमधील जवळपास 15 तरुण अमरावतीत काम करत होते. मात्र, सध्या काम मिळत नसल्याने त्यांनी पायीच आपल्या गावाची वाट धरली असल्याचे पाहायला मिळाले.