अमरावती - मेळघाट मधील जंगलात उन्हाळ्यात वणवा पेटवला जातो. यामध्ये वनसंपदेचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते. हा प्रकार रोखण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने आदिवासी पाड्यांमध्ये जनजागृती केली जाते. या दृष्टीने पाड्यामध्ये माहिती फलक लावण्यात येतात. तसेच या प्रकारचे चित्र संदेश सोशल मीडियावरही व्हायरल केले जात आहेत. सध्या यातील 'शोले चित्रपटातील गबरसिंग आणि ठाणेदारसिंघम यांचे पोस्टर मेळघाटमध्ये चांगलेच चर्चेचे आले आहेत.
मेळघाटच्या जंगलात दरवर्षी आगी लावण्याचे प्रकार सर्वाधिक प्रमाणात घडत आहे. त्यात हजारो हेक्टर जंगलाची राखरांगोळी होते. दुसरीकडे साप, विंचू, अशा सरपटणाऱ्या प्राण्यांपासून ते वाघ, अस्वल, बिबट, रानगवे, हरिण, सांबर नीलगाय आदी प्राण्यांना जंगलातील वनव्यापासून जीव वाचवण्यासाठी सैरभर पळावे लागते. कित्येकदा लहान प्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात. हे नुकसान टाळण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेत जनजागृती सुरू केली.
अरे ओ सांभा...! आली रे आली आता...
जंगलातील आग ही मानवनिर्मित असतात. या घटना टाळण्यासाठी उपाययोजनांचा भाग म्हणून वनविभागाकडून आता सोशल मीडियावर सुद्धा संदेश व्हायरल केले जात आहेत. यात शोले चित्रपटाप्रमाणे "अरे ओ सांभा...! जंगल में आग लगाने पे सरकार कितना जुर्माना रचे है! सरदार, पूरे पाच हजार और दो साल की जेल है...! अशा प्रकारचे संभाषण व्हायरल होत आहेत. सिंघम "चित्रपटातील 'आली रे आली. आता जगालाला आग लावणाऱ्यांची बारी आली' असे पोस्टर अपर प्रधान मुख्य संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अधिकारी यांनी सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.
आग विझवण्यासाठी उलटी बत्तीचा प्रयोग-