अमरावती - अंजनगाव सुर्जी नगर परिषदेच्या कचरा डेपोला अचानक आग लागल्याचे लक्षात येताच नगरपालिका प्रशासनाची तारांबळ उडाली. एका वर्षांपूर्वीच खरेदी केलेले नवीन अग्निशमन वाहन नादुरुस्त असल्याने प्रशासन हतबल झाले. त्यामुळे पालिका प्रशासनाला नाईलाजास्तव दर्यापूर व परतवाडा येथे संपर्क करून त्या ठिकाणचे अग्निशमन वाहन बोलवावे लागले.
कचरा डेपोला लागलेल्या आगीने भयानक रूप घेतले होते. 44 डिग्री सेल्सिअसच्या तापमान असताना, अग्निशमन विभागाचे कर्मचारी गार्डन पाईपने पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, परतवाडा येथील अग्निशमन दलाचे सहकार्याने काही प्रमाणात आग विझविण्यास मदत झाली.
या प्रसंगी अंजनगाव सुर्जी नगर पालिका मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहूरवाघ, बांधकाम अभियंता ठेलकर, अभियंता घोंगे, फायरमॅन अरुण माकोडे, अब्दुल कलाम, अजीज खा, मयूर नायटकर, आशिष कोळाखारे, विष्णू कुऱ्हेकर, शे. अमान, शे. आसिफ, जुबेर खा, विजय भोंडे, राजू बोरोडे, परतवाडा अग्निशमन दल आणि दर्यापूर अग्निशमन दल आग विझविण्यास उपस्थित होते. मात्र, आग विझवण्याचा प्रयत्न सुरू झाला.