ETV Bharat / state

5 People Died In Amravati Accident : अमरावतीत भरधाव ट्रकने कारला चिरडले, एकाच कुटूंबातील 5 जण ठार, तर 7 नागरिक जखमी - नागरिक जखमी

अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात भीषण अपघातात ट्रकने टाटा सुमो कारला चिरडल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटूंबातील पाच जण ठार तर सात जण जखमी झाले. या अपघातात जखमी असलेल्या सात नागरिकांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

5 People Died In Amravati Accident
घटनास्थळावर मदत करताना नागरिक
author img

By

Published : May 23, 2023, 11:28 AM IST

अमरावती : भरधाव ट्रकने टाटा सुमो कारला चिरडल्याने एकाच कुटूंबातील तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले. ही घटना घटना अमरावती दर्यापूर महामार्गावर सोमवारी मध्यरात्री घडली. एकाच कुटूंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातातील सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

कौटुंबीक कार्यक्रमातून येत होते परत : दर्यापूर येथील नागरिक कौटूंबीक सोहळा आटोपून घरी परत येत होते. यावेळी खल्लार पोलीस ठाण्यात हद्दीत ट्रकने कारला चिरडले. या अपघातात कारमधील एकाच कुटूंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. तर इतर सात जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

टाटा सुमोमधील सात जण गंभीर जखमी : दर्यापूर येथून अंजनगावच्या दिशेने निघालेल्या टाटा सुमोमध्ये एकूण सतरा जण बसले होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकची टाटा सुमोला जबर धडक बसल्यामुळे घटनास्थळीच पाच जण ठार झाले. तर टाटा सुमोमधील सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी असणाऱ्या सातही जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना आधी दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यावर त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातात जखमीमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे.

पोलिसांसह ग्रामस्थ आले धावून : खल्लार पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांसह लगतच्या गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातातील जखमींना तुटलेल्या वाहनातून बाहेर काढून त्यांना तात्काळ उपचारासाठी दर्यापूरला पाठवले. या अपघाताचा पुढील तपास खल्लार पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा -

  1. Rape On Teacher : घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत नराधमाचा शिक्षिकेवर अत्याचार, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
  2. Bomb Blast Threat To Mumbai Police : मुंबईत बॉम्बस्फोट करू, मुंबई पोलिसांना ट्विटरवर धमकी
  3. Buldana Bus Accident : पुणे नागपूर महामार्गावर एसटी बस कंटेनरचा भीषण अपघात, सहा प्रवाशी ठार, अनेकजण जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.