ETV Bharat / state

...जेव्हा शिक्षकच वर्गखोलीत दारूच्या नशेत लोळतो - मांजरकापडी जिल्हा परिषद शाळा

गौरखेडा बाजार हे माजी आमदार केवलराम काळे, पंचायत समिती सभापती कविता काळे आणि जिल्हा परिषद सद्स्य दयाराम काळे या आदिवासी नेत्यांचे गाव आहे. त्यामुळे नेत्यांच्याच गावात असा प्रकार घडत असेल तर इतर शाळांचे काय? असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करीत आहेत.

जेव्हा शिक्षकच वर्गखोलीत दारूच्या नशेत लोळतो
author img

By

Published : Jul 10, 2019, 10:07 PM IST

Updated : Jul 10, 2019, 11:19 PM IST

अमरावती - विद्यार्थ्यांना बाहेर काढून शिक्षक दारूच्या नशेत वर्गखोलीत झोपत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील मांजरकापडी जिल्हा परिषद शाळेतील हा प्रकार गावकऱ्यांनी उघडकीस आणला.

...जेव्हा शिक्षकच वर्गखोलीत दारूच्या नशेत लोळतो

गौरखेडा बाजार ग्रामपंचायत अंतर्गत मांजरकापडी गाव येते. याठिकाणी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे. यामध्ये एकूण २९ विद्यार्थी आहेत. त्यासाठी दोन शिक्षक रुजू झाले आहेत. त्यापैकी गेल्या महिन्यात २७ तारखेलाच नामदेव मेश्राम हा दारूडा शिक्षक रुजू झाला. वर्गातील विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढून हा दारूडा वर्गखोलीत लोळत बसतो. यासंबंधी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडे तक्रार केली. त्यानंतर पालकांनी शाळेत जाऊन बघितले असता हा दारूडा शिक्षक वर्गखोलीत दारूच्या नशेत झोपलेला आढळून आला. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी या शिक्षकावर लवकरात लवकर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

गौरखेडा बाजार हे माजी आमदार केवलराम काळे, पंचायत समिती सभापती कविता काळे आणि जिल्हा परिषद सद्स्य दयाराम काळे या आदिवासी नेत्यांचे गाव आहे. त्यामुळे नेत्यांच्याच गावात असा प्रकार घडत असेल तर इतर शाळांचे काय? असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करीत आहेत.

दारूडा शिक्षक नामदेव याचे मागील शाळेमध्ये देखील अशाचप्रकारे वादग्रस्त ठरला होता. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Intro:शांतता राखा : ,दारू ढोसून आलेले गुरुजी शाळेतच झोपा काढत आहे.

विद्यार्थ्यांना बाहेर काढून दारुड्या शिक्षक काढतोय झोपा, अमरावतीच्या मेळघाटातील प्रकार
----------------------------------------------------------------
अमरावती अँकर

विद्यार्थ्यांना व्हरांड्यात काढून गुरुजी वर्गखोलीत दारूच्या नशेत झोपत असल्याचा संतापजनक प्रकार अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील मांजरकापडी गावातील जिल्हा परिषद शाळेत गावक-यांनी उघडकीस आणला.

गुरूजींनी द्यावे ऐसें धडे आणि आपला आदर्श ठेवुनी पुढे असे म्हटल्या जाते परंतु ज्याला विद्यार्थी आपले गुरू मानतात तेच गुरुजी जर विद्यार्थ्यांना ओरांड्यात बाहेर काढून दारू ढोसून झोपा काढत असेल तर काय म्हणावं .नामदेव मेश्राम अस या दारुड्या शिक्षकाच नाव आहे.
. मांजरकापडी येथे गत महिन्यात २७ तारखेला हा शिक्षक रुजू झाला आहे . तालुक्यातील गौरखेडा बाजार ग्रामपंचायत अंतर्गत मांजरकापडी गावाचा समावेश आहे. येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. चार वर्गांमध्ये एकूण २९ विद्यार्थी आहेत. त्यासाठी दोन शिक्षक आहेत. गौरखेडा बाजार हे माजी आमदार केवलराम काळे, पंचायत समिती सभापती कविता काळे व जिल्हा परिषद सदस्य दयाराम काळे या आदिवासी नेत्यांचे गाव आहे. येथेच हा प्रकार असेल, तर इतर शाळांचे काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. सदर शिक्षक यापूर्वीसुद्धा मागील शाळेवर वादग्रस्त ठरल्याची माहिती आहे. शिक्षकावर कारवाईची मागणी पालकांनी केली आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Jul 10, 2019, 11:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.