ETV Bharat / state

Rain Affect Farmers: खा. राणांनी दिली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना नुकसानीची माहिती, पंचनामा करण्याच्या सुचना - Amravati MP Navneet Rana Inspected agricultural

खा. नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच कृषीमंत्री यांना जिल्ह्यात वादळी वारा आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनाम्या सह अहवाल पाठवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

MP Navneet Rana Assurance
शेतीचे झालेले नुकसान
author img

By

Published : Apr 8, 2023, 8:07 PM IST

Updated : Apr 8, 2023, 9:14 PM IST

खासदार नवनीत राणांनी शेताची पाहणी केल्यानंतर विचार मांडताना

अमरावती: ऐन उन्हाळ्यात अमरावती जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि बरसलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. संत्रा, गहू, हरभरा पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी जिल्ह्यातील शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. जिल्ह्याचा दौरा करून राणांनी तालुकातील गावा-गावात जाऊन शेतीची पाहणी केली. थेट शेतात जाऊन त्यांनी बांधावरील शेतकऱ्यांशी संवाद साधला. वादळी वारा आल्याने घरांची पडझड झाली. कित्येक घरांचे टीन पत्रे उडून गेले. अनेक ठिकाणी गुरे -ढोर दगावले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या भावना राणांजवळ व्यक्त केल्या.

शेतकऱ्यांशी साधला संवाद : रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दर्यापूर, अंजनगाव, अचलपूर, चांदूरबाजार, तिवसा, भातकुली व अमरावती तालुकातील भागाची अधिकाऱ्यांसोबत पाहणी करताना नवनीत राणा यांना गहिवरून आले. निसर्गाने साथ सोडली असली तरी आमचे सरकार मात्र शेतकऱ्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे आहे. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही खासदार नवनीत राणा यांनी आज (शनिवारी) शेतकऱ्यांना दिली. राणा यांनी जिल्हातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

हातातोंडाशी आलेला घास हिरावला: एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या नैसर्गिक संकटाने शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. संत्रा तोडणीला आला असला तरीही अनेक शेतकऱ्यांची संत्रा बाग विकली गेली नाही. वादळी वाऱ्यांमुळे संत्रा बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. याचा जबर फटका संत्रा उत्पादकांना बसला आहे. झाडांवरील संत्रा गळून पडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला. एप्रिल महिन्यात बरसलेल्या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा आणि भाजीपाला उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. घरावरील टीन पत्रे उडून गेल्याने लोकांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. या वेळी त्यांनी सांगितले की मी नुकसानीची माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच कृषी मंत्र्यांना दिली आहे. तसेच तत्काळ पंचनामे करुन शासनाला अहवाल सादर करायला सांगितले आहे.

हेही वाचा: Eknath Shinde On Pawar : 'पवार अभ्यास करूनच बोलतात, तुम्ही त्यांचे म्हणणे ऐकून घ्या', अदानी प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Last Updated : Apr 8, 2023, 9:14 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.