ETV Bharat / state

MLA Bachu Kadu : 'मै झुकेंगा नही' आमदार बच्चू कडूंचे पोस्टर झळकले - poster of MLA Bachu Kadu

अमरावती शहरात बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे ( Prahar Jan Shakti Party ) शक्ती प्रदर्शन नेहरू मैदान येथे केले जाणार असून शक्ती प्रदर्शन स्थळावर बच्चू कडू ( MLA Bachu Kadu ) यांचे मै झुकेगा नही असा आशय असणारे अनेक पोस्टर लावण्यात आले असून या पोस्टरची सर्वत्र चर्चा होत आहे.

MLA Bachu Kadu
बच्चू कडूंचे पोस्टर झळकले
author img

By

Published : Nov 1, 2022, 10:47 AM IST

Updated : Nov 1, 2022, 11:56 AM IST

अमरावती : अचलपूरचे आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) आणि बडनेराजे आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांच्या उफाळून आलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज अमरावती शहरात बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे ( Prahar Jan Shakti Party ) शक्ती प्रदर्शन नेहरू मैदान येथे केले जाणार असून शक्ती प्रदर्शन स्थळावर बच्चू कडू यांचे मै झुकेगा नही असा आशय असणारे अनेक पोस्टर लावण्यात आले असून या पोस्टरची सर्वत्र चर्चा होत आहे.

बच्चू कडूंचे पोस्टर झळकले

हजारो कार्यकर्ते सहभागी होणार : आमदार बच्चू कडू आज आपली राजकीय भूमिका जाहिर करणार असल्यामुळे आजच्या शक्ती प्रदर्शन मेळाव्यात प्रहारचे हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. बडनेरा चे आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर राज्यात झालेल्या सत्ता परिवर्तनासाठी 50 खोके घेतल्याचा आरोप केल्यानंतर आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी नाना यांच्यात वाद चिघळला असून आमदार रवी राणा यांच्यासह राज्य सरकारला जा विचारण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्यावतीने आज हे शक्ती प्रदर्शन केले जात आहे.

पोलिसांचा कडे कोट बंदोबस्त : नेहरू मैदान येथे आयोजित प्रहारच्या शक्ती प्रदर्शन मेळाव्या दरम्यान प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असल्याने तसेच यावेळी कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यासाठी सभास्थळी पोलिसांचा कडे कोड बंदोबस्त लावण्यात आला आहे.

काय म्हणाले रवी राणा ? याप्रसंगी बोलताना आमदार रवी राणा म्हणाले की, ज्या पद्धतीने गेल्या ८ दिवसापासून चॅनेलच्या माध्यमातून जे दाखवल जात होत. त्यामुळे शब्द शब्दातून अनेक शब्द बाहेर निघाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे दोन्ही माझे नेते आहेत. त्यांनी काल मला बोलावले व जवळपास साडेतीन तास वर्षा निवासस्थानी बैठक झाली. काही वाक्य न पटणारी होती त्यावर चर्चा झाली. बच्चू कडू हे माझ्यासोबत अमरावती जिल्ह्यामध्ये आमदार आहेत. मी सुद्धा आमदार आहे. आम्ही दोघे सरकार सोबत आहोत. जेव्हा एखादा मतभेद होतो तेव्हा बोलता बोलता तोंडातून जे काही निघाल आहे. एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत जे कोणी आहेत ते आम्ही सर्व सहकारी आहोत. मी जे काही बोललो आहे ते शब्द मी परत घेतो.

बच्चू कडूही त्यांचे अपशब्द मागे घेतील ? यावर बोलताना रवी राणा पुढे म्हणाले की, या वादावर पडदा पडलेला आहे. बोलता बोलता काही शब्दांमधून माझ्याकडून काही चूक झाली तर मोठे मन करून मी माझे शब्द परत घेतो. काही गोष्टी घडतात तेव्हा दोन पावले मागे यावे लागते व पुढे जावे लागते. त्या प्रकारे मी माझी दोन पावले मागे घेतो. देवेंद्र फडणीस हे माझे नेते आहेत त्यांचा आदेश माझ्यासाठी सर्वस्व आहे. म्हणून हे वाद-विवाद नसले पाहिजेत म्हणून मी माझे शब्द परत घेतो.बच्चू कडू कडून सुद्धा काही चूक झाली आहे. काही अपशब्द निघाले आहेत तर ते सुद्धा त्यांचे शब्द मागे घेतील अशी मला अपेक्षा आहे.

Last Updated : Nov 1, 2022, 11:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.