ETV Bharat / state

Navneet Rana Audio Clip : नवनीत राणांच्या त्या ऑडिओ क्लिपबाबत महिला आयोगाने मागीतला खुलासा - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर

नवनीत राणा यांची ऑडिओ क्लिप व्हायरस झाली ( Navneet Rana Audio Clip ) आहे. त्यात त्याच्याकडे मदत मागणाऱ्या महिलेला मला विचारुन लफडा केला का, असा सवाल केला आहे. याची दखल महिला आयोगाने घेतली असून, त्यांना याबाबत खुलासा मागीतला ( Women Commission Notice Navneet Rana ) आहे.

Navneet Rana
Navneet Rana
author img

By

Published : Jan 23, 2022, 12:52 AM IST

Updated : Jan 23, 2022, 1:03 AM IST

अमरावती - खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांचा निकटवर्तीय तसेच युवा स्वाभिमान पार्टीचा असलेला मेळघाट प्रमूख उपेन बच्छले याने आपल्या मुलीला आणि पत्नीला वाऱ्यावर सोडले आहे. याबाबत या पिडीतेने नवनीत राणा यांच्याकडे मदत मागत न्याय देण्याची मागणी केली. मात्र, मदत करण्याऐवजी मला विचारुन तू त्याच्याशी लफडा केला का, असा उलट सवाल नवनीत राणा यांनी या महिलेला केला आहे. याची गंभीर दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. नवनीत राणा यांनी याप्रकरणी योग्य तो खुलासा लेखी स्वरूपात द्यावा, असे निर्देश महिला आयोगाने दिले ( Women Commission Notice Navneet Rana ) आहेत.

https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-am-01-amravati-10016_22012022221801_2201f_1642870081_677.jpg
Navneet Rana Audio Clip

ऑडिओ क्लिप व्हायरल

युवा स्वाभिमान पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता उपेन बच्छले याने आपली फसवणूक केल्याची तक्रार पिडीत महिलेने फोनद्वारे नवनीत राणा यांच्याकडे केली. तेव्हा नवनीत राणा यांनी पिडीतेची मदत करायची सोडून उद्धटभाषेत उत्तर दिले. मला विचारुन लफडा केला का, असा सवाल त्यांनी महिलेला विचारला. हीच दीड मिनिटांची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल ( Navneet Rana Audio Clip ) झाली आहे.

नवनीत राणा यांची व्हायरस ऑडिओ क्लिप

राज्य महिला आयोगाने घेतली दखल

पहिल्या पत्नीला अंधारात ठेऊन उपेन बच्छले याने दुसरे लग्न केले. त्यानंतर पहिल्या पत्नीला आणि 18 महिन्याच्या मुलीला वाऱ्यावर सोडून देणाऱ्या बच्छले याविरुद्ध महिला आयोगाकडे तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी अमरावती पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Women Commission Rupali Chakankar ) यांनी दिले आहे. तसेच, नवनीत राणा यांनाही महिला आयोगाने याप्रकरणाबाबत योग्य तो खुलासा लेखी स्वरुपात द्यावा, असे महिला आयोगाने म्हटले आहे.

हेही वाचा - Maharashtra Tableau 2022 : यंदा राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दाखवणार 'जैवविविधता'

Last Updated : Jan 23, 2022, 1:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.