ETV Bharat / state

Amravati crime: तुला गिफ्ट द्यायचंय म्हणत डोळ्यांवर पट्टी बांधून प्रियकराने केला गळ्यावर चाकूने वार - lover Attacked On His Girlfriend In Amravati

तरुणीचे संकेत याच्यासोबत पाच वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. अमरावतीवरून परतवाडाला भेटायला आलेल्या प्रेयसीला त्याने लॉजवर नेले. लॉजवरच्या एका खोलीत तिला गिफ्ट देण्याच्या बहाण्याने डोळ्यावर पट्टी बांधायला लावली. तिने डोळ्यांवर पट्टी बांधताच त्याने तिच्या गळ्यावर आणि तोंडावर चाकूने वार केले. ही गंभीर घटना सोमवारी दुपारी जिल्ह्यातील परतवाडा शहरात घडली.

Amravati crime
गळ्यावर चाकूने वार
author img

By

Published : Apr 4, 2023, 9:35 AM IST

अमरावती: प्रियकराने प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना सतत घडत आहेत. त्यात चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना अमरावती शहरात घडली आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील 19 वर्षीय तरुणीही अमरावती शहरात गाडगे नगर परिसरात शिक्षणासाठी राहत होती. तिचे वरुड तालुक्यात येणाऱ्या आमनेर गावातील संकेत दिनेश मांडवकर या युवकासोबत सोशल मीडियावर पाच वर्षांपूर्वी भेट झाली. संकेत हा परतवाडा येथे विद्युत वितरण कंपनी कंत्राटी तत्वावर काम काम करतो. 19 मार्च रोजी त्याचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी दोघांचीही भेट होऊ शकली नाही. यामुळे त्याने तिला परत वाड्याला भेटीसाठी बोलावले होते.

लॉजमधील खोलीत केला वार: संकेतने तिच्यासाठी खास अंगठी भेट देण्यासाठी खरेदी केली होती. तर तिने देखील त्याच्यासाठी भेटवस्तू आणली होती. परतवाडा शहरातील जयस्तंभ चौक परिसरात असणाऱ्या टेकाडे कॉम्प्लेक्स येथील एका लॉजमधील खोलीत संकेतने तिला नेले होते. यावेळी तिच्या मोबाईल फोनवर दुसऱ्या युवकाचे सतत मेसेज येत होते. ती आपल्यासह आणखी दुसऱ्या मुलासोबत देखील असल्याचा संशय संकेतला आला. त्यामुळे प्रचंड संतापला. त्याने तिच्या डोळ्यावर पट्टी बांधायला लावल. त्यानंतर संकेतने अचानक चाकूने तिच्या गळ्यावर आणि गालावर वार केले. यानंतर त्याने स्वतःला देखील चाकू मारून जखमी करून घेतले.

पोलिसांनी केला गुन्हा दाखल: दरम्यान या गंभीर प्रकारानंतर त्या युवतीचा ओरडण्याचा आवाज येताच लॉज मालकाने तिला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळतात परतवाडा पोलिसांनी जखमी अवस्थेत असणाऱ्या संकेत मांडवकर याला ताब्यात घेऊन युवतीने दिलेल्या बयानावरून त्याच्याविरुद्ध भादवी कलम 307, 309 अन्वये गुन्हा दाखल केला. त्या युतीचे दुसऱ्यासोबत अफेअर असल्याचा संशय आल्याने संकेतने तिच्यावर चाकूने वार केला, असल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली. या प्रकरणाचा सखोल तपास करीत असल्याची माहिती परतवाड्याचे ठाणेदार संदीप चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा: Amravati crime news पाहुणे म्हणून आलेल्या अल्पवयीन मुलीला दारू पाजून सामूहिक अत्याचार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.