ETV Bharat / state

अमरावती : समृद्धी महामार्गालगतच्या खड्यात पडून मजुराचा मृत्यू

author img

By

Published : Feb 9, 2021, 7:42 PM IST

धामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टा शिवारात समृद्धी महामार्गाला लागणाऱ्या मुरूमसाठी मोठमोठे खड्डे करण्यात आले आहेत. याच खड्यांमध्ये पडून एका मजुराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. या मजूराचा पाय घसरून तो पाण्यात पडला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

laborer-died-after-falling-into-pothole-near-samrudhi-highway-in-amravati
अमरावती : समृद्धी महामार्गा लगतच्या खड्यात पडून मजुराचा मृत्यू

अमरावती - जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टा शिवारात समृद्धी महामार्गाला लागणाऱ्या मुरूमसाठी मोठमोठे खड्डे करण्यात आले आहेत. याच खड्यांमध्ये पडून एका मजुराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. पाण्याची खोली आणि गाळ असल्यामुळे मजुराला या खड्यांमध्ये आपला जीव गमवावा लागला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या महामार्गावर काम करताना मजूराचा पाय घसरून तो पाण्यात पडला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी खचला होता पूल -

नागपूर ते मुंबई केवळ ८ तासात हे अंतर पार करता येईल, असा मोठा समृद्धी महामार्ग तयार होतो आहे. सद्या या रस्त्याचे विदर्भातील काम अंतिम टप्यात आहे. उर्वरित काम कंत्राटदार झपाट्याने पूर्ण करीत असताना काही दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील सावळा रोड जवळचा पूल अचानक खचला होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. यावेळी शीघ्रगतीने कामकाज करण्याच्या नादात कंत्राटदार बोगस काम करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता.

प्रशासनाकडून वारंवार माहिती दडवण्याचा प्रयत्न -

मागील काही महिन्यांत समृद्धी महामार्गावरील कामावर अपघाताच्या घटना घडत आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा निर्माणाधीन पूल कोसळला होता. तेव्हा एकही मजूर जखमी झाला नसल्याचा दावा समृद्धी प्रशासनाने केला होता. आजच्या ही घटनेत तोच प्रकार समोर आला आहे.

१२ जिल्ह्यातून जाणारा महामार्ग

हा समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई दरम्यान १२ जिल्ह्यांतून जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे व मुंबई या १२ जिल्ह्यांचा समावेश आहे. अप्रत्यक्षपणे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर व रायगड यांनाही जलद वाहतुकीचा फायदा होणार आहे. जवळपास २६ तालुके व ३९२ गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमरावतीला येऊन समृद्धीमाहामार्गाची पाहणी केली होती. यावेळी नागपूर ते शिर्डी महामार्ग १ मेपासून सुरू करणार असल्याचे सांगितले होते.

हेही वाचा - भारतरत्नांची चौकशी घरी जाऊन नाही, केवळ ट्विटची माहिती घेणार - छगन भुजबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.