ETV Bharat / state

गावचे झाले पुनर्वसन;' कुआ-आम' मात्र जैसे थे

दोन पहाडांच्या मधात असणाऱ्या येथील गावाचे पन्नास वर्षांपूर्वी पुनर्वसन झाले. मात्र कुआ-आम आजही जैसे थे आहे.

कुआ आम
author img

By

Published : May 27, 2019, 4:26 AM IST

अमरावती - जंगल दऱ्याखोऱ्यांसोबतच मेळघाटात काही स्थळे ऐतिहासिक असून घनदाट जंगलात लपलेली आहेत. अशाच काही ठिकाणांपैकी 'कुआ-आम ' हे ठिकाण. हा परिसर विहरीच्या काठावर असलेले आंब्याचे झाड म्हणजेच कुआ-आम हे आपले नाव आणि अस्तित्व राखून आहे. दोन पहाडांच्या मधात असणाऱ्या येथील गावाचे पन्नास वर्षांपूर्वी पुनर्वसन झाले. मात्र कुआ-आम आजही जैसे थे आहे.

कुआ आम बद्दल माहिती देताना स्थानिक

मेळघाटात धुळघात रेल्वे वन परिक्षेत्राच्या हद्दीत २१ की.मी अंतरावर गोलाई या वन वर्तुळात' कुआ-आम' या नावाचा परिसर आहे. हा परिसर घनदाट जंगलाने वेढला असून वाघ, बिबट्या, अस्वल अशी जंगली श्वापदे या परिसरात आढळतात. ५० वर्षांपूर्वी या भागात मालप पांढरी नावाचे आदिवासींचे छोटेसे गाव वसलेले होते. सत्तर ते ऐंशी लोकवस्तीच्या या गावाला पहाडाखाली नाल्याच्या काठावर असणारी विहीर ही एकमात्र पाण्याचे ठिकाण होते. या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे या विहिरीच्या सभोवताली आंबेची झाडे होती. यामुळे या विहिरीचे नाव कुआ-आम असे पडले.

या भागातील घनदाट जंगल आणि प्राण्यांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने मालाप पांढरी या गावचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन केले. कधी काळी विहिरीवर पाणी नेण्यासाठी गावातील महिला, युवकांची गर्दी असायची. मात्र, हा संपूर्ण परिसर घनदाट जंगलाने वेढला आहे. आजही बुजत चाललेल्या या विहिरीला पाणी आहे. मात्र वापरात नसल्याने या विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नाही. विहिरीच्या काठावर आजही एक आंब्याचे झाड आहे. विहिरीच्या वर पगडावरील सपाट जमिनीवर आजही खोदकाम केले ते जमिनीतून मातीच्या भांड्यांचे अवशेष सापडतात. या परिसरात वन विभागाच्या कर्मचाऱ्या मदतीशिवाय कोणीही जाण्यासाठी धजावत नाही.

Intro:जंगल दऱ्याखोऱ्यांसोबतच मेळघाटात काही स्थळं ऐतिहासिक असून घनदाट जंगलात हरवले आहे. अशाच काही ठिकाणांपैकी 'कुआ-आम ' अर्थात आंब्याच्या झाडाकाठी असणारी विहीर ही आपले नाव आणि अस्तित्व राखून आहे. दोन पहाडांच्या मधात असणाऱ्या या विहिरीलगत पहाडावर वसलेल्या गावाचे पन्नास वर्षांपूर्वी पुनर्वसन झाले असताना गोलाई वनवर्तुळात येणारा कुआ-आम आजही जैसे थे आहे.

Body:मेळघाटात धुळघात रेल्वे वन परिक्षेत्राच्या हद्दीत 21 की.मी अंतरावर गोलाई या वन वर्तुळात' कुआ-आम' या नावाचा परिसर आहे. हा परिसर घनदाट जंगलाने वेढला असून वाघ, बिबट, अस्वल असे जंगली श्वापद या परिसरात आढळतात. 50 वर्षांपूर्वी या भागात मालप पांढरी नावाचे आदिवासींचे छोटेसे गाव वासायचे. सत्तर ते ऐंशी लोकवस्तीच्या या गावाला पहाडाखाली नाल्याच्या काठावर असणारी विहीर ही एकमात्र पाण्याचे ठिकाण होते. या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे या विहिरीच्या सभोवताली आंबेची झाडे होती. यामुळे या विहिरीचे नाव कुआ-आम असे पडले. या भागातील जंगल आणि प्राण्यांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने मालाप पांढरी या गावचे पुनर्वसन केले. कधी काळी विहिरीवर पाणी नेण्यासाठी गावातील महिला, युवकांची गर्दी राहायची आज मात्र हा संपूर्ण परिसर भयाण जंगलाने वेढला आहे. आजही या विहिरीला पाणी आहे मात्र ते पिण्यायोग्य नाही. विहिरीच्या काठावर आजही एक आंब्याचे झाड आडवे वाढलेले दिसते. विहिरीच्या वर पगडावरील सपाट जमिनीवर आजही खोदकाम केले ते जमिनीतून मातीच्या भांड्यांचे अवशेष सापडतात. या परिसरात वन विभागाच्या कर्मचाऱ्या मदतीशिवाय कोणीही जाण्यासाठी धजावत नाही.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.