अमरावती - बुद्ध पौर्णिमेनिमित्त वनविभागाच्या वतीने आयोजित वन्य प्राणी गणनेत शेकडो वन्यजीवप्रेमी सहभागी झाले होते. मेळघाटात एकूण 466 मचानीवरून ( 466 scaffolding in Melghat ) 100 हजार वन्यजीव प्रेमींनी ( 100 thousand wildlife lovers ) बुद्ध पौर्णिमेच्या ( Buddha Pournima ) लख्ख प्रकाशात रात्री विविध वन्यजीवांचे दर्शन घेतले. कोरोनामुळे तीन वर्ष मेळघाटातील हा महत्त्वपूर्ण उपक्रम बंद असल्यामुळे यावर्षी वन्यजीवप्रेमी अतिशय उत्साहाने वन्य प्राणी पाहण्यासाठी सहभागी झाले होते. विविध ठिकाणी वन्यजीवप्रेमींना वाघांचे दर्शन घडले असून इतर प्राणीही अनेकांना पाहायला मिळाले.
चिखलदाराच्या जंगलात वाघांचे दर्शन : मेळघाटातील पूर्व आणि पश्चिम घाटात एकूण 466 मचानावरुन वन्यजीव प्रेमींनी बुद्ध पौर्णिमेची रात्र जंगलात व्यतीत केली. चिखलदरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मेमना बीटमध्ये काही वन्यजीव प्रेमींना रात्री दीड वाजेच्या सुमारास वाघाचे दर्शन घडले. तर पहाटे बिबट्याही पाहायला मिळाला. रानगवे, सांबर, हरिण आदी प्राणी सुद्धा काही ठिकाणी आढळून आले. यासह मोर, सर्पगरुड, घुबड, रॉकेट थ्रीटॅंगो असे पक्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जंगलात संचार करताना आढळून आले.
वन्यजीव प्रेमीमध्ये उत्साह : कोरोनामुळे 2019, 2020 आणि 2021 मध्ये बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्यप्राणी गणना रद्द करण्यात आली होती. यामुळे दरवर्षी या उपक्रमात सहभागी होणाऱ्या वन्यजीव प्रेमींना निसर्गाचा अद्भुत अनुभव देणाऱ्या संधी पासून मुकावे लागले होते. यावर्षी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील प्राणी गाण्याची जाहिरात वेबसाईटवर येताच अवघ्या काही तासातच मेळघाटातील सर्व 466 झाडांची बुकिंग पूर्ण झाली होती. बुद्ध पौर्णिमेला मोठ्या उत्साहात वन्यजीवप्रेमी त्यांना मिळालेल्या शाळांच्या ठिकाणी पोहोचले होते. चिखलदरा धारणी अकोट या सर्व वनपरिक्षेत्रात वन्यजीव प्रेमींचा उत्साहात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री पाहायला मिळाला.
लवकरच कळेल वन्यप्राण्यांची संख्या : बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्यजीवप्रेमी पाहिलेल्या प्राण्यांची नोंद वन्यजीव विभागाच्या वतीने एकत्र केली जात आहे. या नोंदीनुसार मेळघाटात वाघांसह इतर सर्व प्राण्यांची नोंद, संख्या किती आहे, याची माहिती एकत्रित करून ती लवकरच जाहीर केली जाणार आहे.
हेही वाचा - SPECIAL REPORT : भटक्या समाजासाठी उच्चशिक्षित तरुणाची भटकंती, शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी करतोय प्रयत्न