ETV Bharat / state

जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी माझी 'तीर्थयात्रा' - आदित्य ठाकरे - अमरावती जिल्हा प्रमुख सुनील खराटे

जनआशीर्वाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे मंगळवारी अमरावतीत आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

आदित्य ठाकरे
author img

By

Published : Aug 28, 2019, 7:38 AM IST

Updated : Aug 28, 2019, 9:57 AM IST

अमरावती - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह संपूर्ण देश भगवा करणाऱ्या माझ्या बांधवाना भेटण्यासाठी अंतराचा विचार न करता निघालो आहे. ही माझी जनसभा नाही, तर जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी ही माझी तीर्थयात्रा असल्याचे विधान युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी अमरावतीत केले.

आदित्य ठाकरे अमरावतीमध्ये बोलताना

हेही वाचा - आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा मुख्यमंत्र्यांच्या शहरात

जनआशीर्वाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे मंगळवारी अमरावतीत आले होते. नवाथे चौक येथे आयोजित सभेत आदित्य ठाकरे यांच्यासह केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, माजी खासदार आनंदराव अडसूळ, प्रिती बंड प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अमरावती जिल्हा प्रमूख सुनील खराटे यांनी आदित्य ठाकरे यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले.

हेही वाचा - आदित्य ठाकरेंच्या 'जनआशीर्वाद' यात्रेसाठी चक्क विजेची चोरी!

अवघ्या पाच मिनिटांच्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी काही पक्ष सध्या मतं मिळवण्यासाठी यात्रा काढत आहेत. मात्र, आम्ही मतांसाठी नाही, तर आम्हाला साथ देणाऱ्या जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि भविष्यातही त्यांची साथ आम्हला लाभावी, यासाठी यात्रा काढली आहे. माझ्यावर पक्षाचे, शिवसैनिकांचे संस्कार आहेत. या संस्कारातून नवा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. अमरावतीकरांचा आशीर्वाद माझ्या पाठिशी राहील, अशी अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, तिवसा येथेही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा आली असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्रीय उद्योग व अवजड मंत्री अरविंद सावंत, माजी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार संजय राठोड, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश वानखडे, तिवसा विधानसभा संघटक विलास माहुरे, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख दिनेश वानखडे, तिवसा तालुका युवासेना अध्यक्ष आकाश माहुरे, प्रदीप गौरखेडे, श्याम देशमुख, अनिल थुल, राहुल लांजेवार, अमोल पाटीलसह आदी उपस्थित होते,

Intro:लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह संपूर्ण देश भगवा करणाऱ्या माझ्या बांधवाना भेटण्यासाठी अंतराचा विचार न करता निघालो आहे. ही माजी जनसभा नाही तर जमतेचा आशीर्वाद घेण्यासाठी ही माझी तीर्थयात्रा असल्याचे भावनिक विधान आदित्य ठाकरे यांनी अमरावतीत केले.

Body:आशीर्वाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे आज अमरावतीत आले. नवाथे चौक येथे आयोजित सभेत आदित्य ठाकरे यांच्यासह केंद्रीयमंत्री अरविंद सावंत, माजी खासदार आनंदराव अडसूळ, प्रिती बंड प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अमरावती जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांनी आदित्य ठाकरे यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले.
अवघ्या पाच मिनिटांच्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी काही पक्ष सद्या मतं मिळविण्यासाठी यात्रा काढीत आहेत मात्र आम्ही मतांसाठी नाही तर आम्हाला साथ देणाऱ्या जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि भविष्यातही त्यांची साथ आम्हला लाभावी यासाठी यात्रा काढली आहे.माझा पक्षाचे, शिवसैनिकांचे संस्कार माझ्यात आहे. या संस्कारातून नवा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. अमरावतीकरांची आशिर्वाद माझ्या पाठीशी राहील अशी अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

Conclusion:
Last Updated : Aug 28, 2019, 9:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.