अमरावती: श्रीक्षेत्र अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथील नाथ परंपरेतील श्री देवनाथ मठाचे आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांना उत्तरप्रदेश मुख्यमंत्री कार्यालया कडून नुकतेच दूरध्वनीवरून मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे. कोरोना संकट काळात पार पडलेल्या अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यास देशभरातील बोटावर मोजण्याइतकेच संत आणि मान्यवरांना निमंत्रित केले गेले गेले होते तेव्हाही जितेंद्रनाथ महाराजांना विशेष निमंत्रण होते. त्या सोहळ्यात सहभागी झाल्यावर ते काशी कॉरिडॉर च्या लोकार्पण कार्यक्रमात सुद्धा उपस्थित होते. सुमारे ६०० वर्षांपासून असणाऱ्या प्राचीन श्रीनाथ पीठाचे स्वामी श्रीजितेंद्रनाथ महाराज हे अठरावे पीठाधीश आहेत. आचार्य स्वामी जितेंद्रनाथ हे विश्व हिंदू परिषदेच्या उच्चाधिकार समितीचे सदस्य , केंद्रीय मार्गदर्शक मंडळाचे सदस्य आणि धर्मजागरण मंचाचे केंद्रीय मार्गदर्शक आहेत.
जितेंद्रनाथ महाराजांना आदित्य नाथांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण
उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath in Uttar Pradesh) 25 मार्चला पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ (Oath of office of the Chief Minister) घेणार आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील श्री देवनाथ मठाचे मठाधिपती श्री जितेंद्रनाथ महाराज (Jitendranath Maharaj) यांना निमंत्रित करण्यात आले आहे.