अमरावती : भारताचे पहिले कृषिमंत्री आणि विदर्भात शिक्षणाच्या प्रसारासाठी आयुष्य वाहणाऱ्या डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी (education from memory of Shikshan Maharishi )आपल्या संपूर्ण आयुष्यात शिक्षण कृषी क्षेत्रात दिलेले योगदान यासह भारताच्या संविधान निर्मितीत त्यांचा असलेला मोलाचा वाटा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात येणाऱ्या पापळ सारख्या छोट्याशा गावात जन्म झालेल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख ( Dr Punjabrao Deshmukh ) आजही समाजासाठी एक आदर्श आहेत. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने ( Shree Shivaji Education Institution ) अमरावती शहरातील पंचवटी चौक परिसरात डॉक्टर पंजाबराव देशमुख भाऊसाहेबांचा संपूर्ण जीवनपट उलगडणारे स्मृती केंद्र हे विद्यार्थ्यांना शिक्षणाची स्फूर्ती ( Encouraging students to learn ) देणारे स्फूर्ती केंद्र देखील आहे. ( life work of Punjabrao Deshmukh in Amravati )
स्मृति केंद्रात भाऊसाहेबांचा जीवनपट : डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 ला पापड या छोट्याशा गावात झाला होता. आज विदर्भातील सर्वात मोठी श्री शिवाजी शिक्षण संस्था डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केली होती. त्यांचा संपूर्ण जीवनपट नव्या पिढीला कळवा ह्या उद्देशाने श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने 2002 मध्ये पंचवटी चौक परिसरात भव्य असेच कृती केंद्र संपूर्ण समाजासाठी खुले केले. अतिशय अप्रतिम असणाऱ्या या स्फूर्ती केंद्रामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी ज्या घरात बालपण घालवले त्या घराचे छायाचित्र तसेच त्यांनी वापरलेल्या वस्तू देखील संग्रहित करून ठेवण्यात आल्या आहेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव असणाऱ्या पापळ् संदर्भातील इतिहासाची माहिती देखील या कृती केंद्रात उपलब्ध आहे. सम्राट अशोकानंतर आंध्र सातवाहन अभीर वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट आणि यादव या राजवंशांची विदर्भात सत्ता असताना त्या पुरातन काळात पापळ हे गाव वसले होते. पापड या गावात विष्णूचे पुरातन मंदिर आहे. पापड वरून दिसणाऱ्या नांदगाव खंडेश्वर चे देवालयात श्रीकृष्ण देव यादव यांचा शिलालेख देखील आहेत. असा पुरातन इतिहास असणाऱ्या पापळ गावात भाऊसाहेब इयत्ता चौथी पर्यंत शिकले. त्यांचे वडील शामराव देशमुख आणि आई राधाबाई देशमुख यांनी इयत्ता चौथीनंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना शिक्षणासाठी चांदुर रेल्वे तालुक्यात असणाऱ्या सोनगाव येथे पाठवले होते. हा संपूर्ण उल्लेख या स्मृती केंद्रात मिळतो. भाऊसाहेबांच्या लहानपणीचे मित्र त्यांच्या घरातील वातावरण अशी संपूर्ण माहिती छायाचित्रांसह या स्मृति केंद्रात वाचायला आणि पाहायला मिळते.
भाऊ साहेबांच्या शिक्षणाची प्रेरणादायी माहिती : या स्मृती केंद्रामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या शिक्षणासंदर्भात आजच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल अशी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपल्या आई-वडिलांची परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे शेतजमीन गहाण ठेवून आपल्याला शिक्षणासाठी पैसे दिले असल्याची जाण भाऊसाहेबांना कायम होती. त्या काळात त्यांनी आई-वडिलांना लिहिलेल्या पत्रातून अनेक गोष्टी स्पष्ट होतात ती सर्व पत्र या स्मृती केंद्रात जतन करून ठेवण्यात आली आहेत. संस्कृतचे जागतिक कीर्तीचे महापंडित प्राध्यापक ए.बी. किथ यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी व्हेन्स डनलॉप संस्कृत रिसर्च स्कॉलरशिप ही परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी तीन वर्षांची स्कॉलरशिप मिळवली. भाऊसाहेबांनी 1923 मध्ये संस्कृत विषयात एम ए ही पदवी मिळवली. विश्वविख्यात भाषा शास्त्रज्ञ प्राध्यापक ए ए मॅरडॉनल यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेबांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात द ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ रिलिजन इन वेदिक लिटरेचर या विषयाचे संशोधन करून 1925 मध्ये डॉक्टरेट पदवी मिळवली. या स्मृतिभावनात असलेली भाऊसाहेबांच्या शिक्षणासंदर्भात अशी प्रेरणादायी माहिती विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे.
स्मृति केंद्रात संविधानाची प्रत : भारतीय संविधानाची जडणघडण करण्याची संधी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना मिळाली होती. 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 अशा तीन वर्षाच्या कालावधीत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी संविधान समितीच्या वाद विवादात भाग घेतला. संविधान निर्मितीत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा अतिशय मोलाचा वाटा होता. या स्मृती केंद्रामध्ये भारतीय संविधानाची प्रत जतन करून ठेवण्यात आली आहे यासोबतच संविधान निर्मितीत वाटा असणाऱ्या सर्व सदस्यांचा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत असणारे भव्य छायाचित्र या स्मृती केंद्राला भेट देणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधणारे आहे.
स्मृती केंद्र परिसरात समृद्ध वाचनालय : डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती केंद्रालगत भव्य असे वाचनालय देखील आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जीवन कार्यावर संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे ग्रंथ या ठिकाणी उपलब्ध आहेत. अनेक विद्यार्थी या वाचनालयाचा संशोधनाकरिता लाभ घेतात अशी माहिती श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप इंगोले 'ईटीव्ही भारत 'शी बोलताना म्हणाले. डॉक्टर पंजाबराव देशमुख नव्या पिढीला कळावे यासाठी या स्मृती केंद्र परिसरात अनेक शाळा आणि महाविद्यालयाच्या सहली देखील आयोजित केल्या जातात अशी माहिती देखील दिलीप इंगोले यांनी दिली. या ठिकाणी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पहिल्या शाळेपासून तर वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत ची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. तसेच संस्थेच्या पहिल्या कार्यकारिणीपासून आतापर्यंतच्या कार्यकारिणीची संपूर्ण माहिती देखील या ठिकाणी उपलब्ध आहे.
स्मृति केंद्रालगत ज्ञानाची ज्योत : डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या स्मृती भावना लगत भाऊसाहेबांनी विदर्भात लावलेली ज्ञानाची ज्योत कायम ठेवत राहावी यासाठी अतिशय देखणी आणि भव्य वास्तू उभारण्यात आली आहे. या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंती उत्सवा दरम्यान सलग तीन दिवस भव्य अशी ज्योत पेटवली जाते या ठिकाणी लख्ख अशी रोषणाई देखील जयंती उत्सव काळात केली जाते. डॉक्टर पंजाबराव देशमुख हे नेमके काय होते हे कळण्यासाठी प्रत्येकाने या स्मृती केंद्राला भेट द्यावी असे आवहान देखील दिलीप इंगोले यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना केले.