अमरावती - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढल्याने सध्या सोयाबिनचे भाव हे वाढले आहेत. सोयाबिन विक्रीच्या हंगामात प्रती क्विंटल 3 हजार 500 रुपयांपर्यंत भाव असताना, चांगल्या सोयाबीनचे दर सध्या 4 हजार 200 पर्यंत पोहोचले आहेत. मात्र, सोयाबिनचे दर वाढले असले तरी याचा फायदा अल्प शेतकऱ्यांना होत आहे. तर जास्तीत जास्त फायदा हा व्यापाऱ्यांचा होत असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा - मुंबईतील 'हे' जपानी बौद्ध विहार नक्कीच तुम्हाला माहीत नसेल, घ्या जाणून
सोयाबिन काढणीच्या वेळेस आलेल्या पावसामुळे सोयाबिन खराब होईल, या भीतीने शेतकऱ्यांनी आपला माल हा विकून टाकला आहे. मात्र, आता सोयाबिनचे दर वाढल्यामुळे याचा फायदा हा व्यापाऱ्यांना होत आहे.
हेही वाचा - मुंबई विद्यापीठाच्या जमीन घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा; माजी कुलगुरू मुणगेकरांची मागणी
सरकारने जाहीर केलेला हमीभाव हा 3 हजार 710 इतका होता. परंतु, सोयाबिन हे पाण्याने खराब झाले असल्याने त्यावेळी शेतकऱ्यांना भाव मिळू शकला नाही. तर आता सोयाबिनची बाजारपेठेत असलेली आवक मागणीच्या तुलनेत कमी असल्याने सोयाबिनचे दर हे वाढले आहेत.