ETV Bharat / state

अमरावतीत 'तोक्ते' वादळाचा परिणाम.. जोरदार वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित

author img

By

Published : May 16, 2021, 5:24 PM IST

अमरावतीत रविवारी दुपारी अचानक झालेल्या वादळाचा फटका महावितरणला बसला असून यामध्ये महावितरण यंत्रणा विस्कळीत होऊन काही भागाचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. महावितरण यंत्रणा लागलीच कामाला लागली असल्याने टप्प्या-टप्प्याने खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे.

cyclone-tauktae-in-amravati
cyclone-tauktae-in-amravati

अमरावती - रविवारी दुपारी अचानक झालेल्या वादळाचा फटका महावितरणला बसला असून यामध्ये महावितरण यंत्रणा विस्कळीत होऊन काही भागाचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. महावितरण यंत्रणा लागलीच कामाला लागली असल्याने टप्प्या-टप्प्याने खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे.

वीज पुरवठा करणाऱ्या वाहिन्या तुटल्या -

२२० केव्ही कोंडेश्वर या पारेषणच्या अति उच्चदाब उपकेंद्रातून अमरावती शहराला वीज पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही वडाळी आणि ३३ केव्ही विद्युत नगर या वाहिन्यांचा वीज पुरवठा खंडित झाला. परंतु महावितरणच्या प्रयत्नाने ३३ केव्ही वडाळी व ३३ केव्ही विद्युत नगर या वाहिनीचा वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

शहरात सर्वत्र बत्ती गुल -

११ केव्ही राजकमल,११ केव्ही एल.आय.सी.११ केव्ही श्रीकृष्ण पेठ आणि ११ केव्ही मोरबाग या ३३ केव्ही पॉवर हाऊस या उपकेंद्रातून निघणाऱ्या वाहिन्यांचाही वीज पुरवठा बाधित झाला आहे. याशिवाय २२० केव्ही अमरावती या उच्चदाब उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ केव्ही वडाली, ११ केव्ही बडनेरा, ११ केव्ही टाऊन ३ आणि ११ केव्ही लक्षमीनगर या वीज वाहिन्यांचाही वीज पुरवठा खंडित झाला आहे.

झाड कोलमडले -

वादळ एवढे प्रचंड होते की रामपुरी कॅंम्प येथे रोहित्र पडले आहे. याशिवाय झाडही वीज वाहिनीवर पडले आहे. पलास लाईन गाडगेनगर येथेही वीज वाहिनीवर झाड पडून वीज वाहिनी तुटली आहे.

टप्प्या-टप्प्याने काम सुरू -

महावितरण यंत्रणा युध्दस्तरावर कामाला लागली आहे. अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे, कार्यकारी अभियंता आनंद काटकर या सर्व घडामोडीवर लक्ष देऊन आहेत. वीज पुरवठा सुरळीत करायला थोडा वेळ लागला तरी टप्याटप्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.