अमरावती :लग्नात घोड्याला विशेष महत्व आहे. नवरदेवाची घोड्यावर बसून वरात काढली जाते. वराती दरम्यान घोड्याला नाचवले जाते खरे. पण हा नाचणारा घोडा नाचायला कसा शिकतो हे तुम्हाला माहित आहे का? तर लग्नात नाचणाऱ्या या घोड्याला विशिष्ट पद्धतीने शिकवले जाते. घोड्याला योग्य पद्धतीने शिक्षण दिल्यानंतरच त्याला वरातीकरिता पाठवले जाते. ज्याप्रमाणे एखाद्या लहान जन्मलेल्या मुलांना आपण शिकवतो त्याचप्रमाणे त्या घोड्याला शिकवले जाते.
घोड्यालाही दिले जाते शिक्षण - अगदी लहान वयातच या घोड्याला नाचणे शिकवण्यासाठी एका खास एका खास प्रशिक्षकाकडे पाठवले जाते. त्या घोड्याला समजणारी भाषा त्या प्रशिक्षकाला माहिती असते. तो त्या घोड्याला समजेल अशाच भाषेत शिक्षण देत असतो. यासाठी सर्वात महत्त्वाचे असते ते, म्हणजे त्या प्रशिक्षकाचा त्या घोडा सोबत असणारा सहवास. हा सहवास जेवढा जास्त काळ असेल तेवढा त्या घोड्याला शिकण्यासाठी मदत होते, किंवा त्या प्रशिक्षकाला शिकवण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागत नाही.
नवरदेवाची वरात घोडीवरूनच का काढतात - सर्व धर्मांच्या स्वतःच्या आपापल्या रूढी आणि परंपरा आहेत. हिंदू धर्मातही अनेक प्रथा आहेत. यापैकी एक म्हणजे लग्नाआधी वराला घोड्यावर बसवून वरात काढणे. अनेकदा लोकांमध्ये उत्सुकता असते की लग्नाच्या निमित्ताने वर हा घोडीवर का बसलेला असतो ? परंतु खूप कमी लोकांना याचे उत्तर माहित असेल. लग्नाच्या वेळी वराला घोडीऐवजी इतर कोणत्याही इतर प्राण्यांवरून वरात का काढली जात नाही? घोडीवर वराला बसवण्याची प्रथा प्राचीन काळापासून हिंदूंमध्ये प्रचलित आहे. त्यामागे अनेक, कथा अस्तित्वात आहेत.
घोड्यांना हिंदू संस्कृतीमध्ये फार महत्व आहे - मग तो अश्वमेध यज्ञ असो वा कृष्णाकडून अर्जूनाचा रथ चालवणं असो घोड्यांचं महत्व वेळोवेळी बघायला मिळतं. तसेच राजा म्हटले की घोडा असणारच हे समीकरणच होतं. पण घोडा चालवण्याचा थेट अर्थ असा आहे की, घोडा चालवणाऱ्या व्यक्तीने आता बालपणाचा त्याग केला आहे. ती व्यक्ती जबाबदाऱ्या असलेल्या जीवनाच्या नव्या अध्यायाला सुरूवात करणार असते असा समज आहे.
हेही वाचा - Chetak Festival : चेतक फेस्टीव्हलमध्ये अश्व नृत्य स्पर्धांसाठी देशभरातील अश्व दाखल