ETV Bharat / state

Gaymukh Temple Amravati : विदर्भात 'गायमुख' नावाने प्रसिद्ध आहे ६०० वर्षे जुने शिवमंदिर, जाणून घ्या सविस्तर इतिहास

अमरावती शहरापासून साधारणतः २५ किलोमीटर अंतरावर 'गायमुख' या नावाने हे शंकराचे मंदिर प्रसिद्ध आहे. वऱ्हाड प्रांतातील 'छोटे हरीद्वार' असा उल्लेख या मंदिराचा तत्कालीन लेखातून करण्यात आला आहे. महाशिवरात्रीला येथे मोठ उत्सव असतो.

Gaymukh Temple Amravati
गायमुख शिव मंदिर
author img

By

Published : Feb 12, 2023, 6:09 PM IST

Updated : Mar 13, 2023, 8:01 AM IST

प्रतिक्रिया देतांना मंदिराचे व्यवस्थापक आणि सचिव

अमरावती : अमरावती शहरापासून साधारणतः २५ किलोमीटर अंतरावर अमरावती ते चांदूर रेल्वे या राज्य महामार्गावर, मांजरखेड कसबा या गावाच्या वेशीवरच, खोलाट नदीच्या काठावर ६०० वर्ष जुने असलेले प्राचीन पातळेश्वर आणि गुप्तेश्वर मंदिर आहे. या शिवमंदिराचा इतिहास खूप वेगळा आहे. वऱ्हाड प्रांतातील 'छोटे हरीद्वार' असा उल्लेख या मंदिराचा तत्कालीन लेखातून करण्यात आला आहे. विदर्भात 'गायमुख' या नावाने हे शंकराचे मंदिर प्रसिद्ध आहे.

उंबराच्या झाडाचे दूध पिंडीवर पडत असल्याचा इतिहास : गुप्तेश्वर आणि पातळेश्वर अशा दोन स्वयंभू पिंड या मंदिरात आहेत. तपोनेश्वर येथुन सोडलेल्या मेंढ्या या येथील मंदिरा पर्यंत जशाच्या तशा पोहोचल्याचा इतिहास आहे. या मंदिरात एक उंबराचे झाड होते. त्या उंबराच्या झाडाचे दूध त्या शंकराच्या पिंडीवर पडत असल्याचा प्राचीन इतिहास असल्याची माहिती, श्री पातळेश्वर व श्री रामचंद्र संस्थांनचे सचिव अशोक श्यामराव देशमुख यांनी दिली. या मंदिरातील मूर्ती ही जागृत देवस्थान आहे. गेल्या 42 वर्षापासून आम्ही या ठिकाणी दहा दिवसीय महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करतो. यावर्षी उद्यापासून महाशिवरात्री शिवपुराण व ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायणाला सुरुवात होत असल्याचे, संस्थांनचे सचिव देशमुख यांनी सांगितले.

श्रावण महिन्यात असते मोठी गर्दी : दरवर्षी श्रावण महिन्यात महाराष्ट्रभरातून भाविक या ठिकाणी येतात. यवतमाळ, अमरावती, नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली यासह संपूर्ण महाराष्ट्रातूनच या ठिकाणी दर्शनासाठी भाविक येतात. हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ती झाल्याचे भाविक भक्त सांगत असल्याचे काही भक्तांनी यावेळी सांगितले. दरवर्षी साधारणतः २० ते २५ हजार श्रद्धाळू या ठिकाणी दर्शनासाठी येत असल्याची माहिती संस्थेचे सचिव देशमुख यांनी दिली.

वऱ्हाडातील छोटेंसें हरिद्वारच असा इतिहासात उल्लेख : हें स्थान वऱ्हाडांतील छोटेंसें हरिद्वारच होय. वऱ्हाडासारख्या अत्यंत उष्ण प्रदेशांत असलें रमणीय स्थळ ज्या महात्म्याने निर्माण केलें त्यांची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. बहुत करून मोंगलांच्या धामधुमीच्या काळांत अवनत स्थितींत पडून ह्या स्थानाची आजपर्यंत अवहेलना झाली. शहरापासून दूर अशा खेडेगांवीं हें स्थान असल्यामुळे ह्या स्थानाचा महिमा आजपर्यंत गुप्तच राहिला. पण सुदैवाची गोष्ट अशी कीं, मांजरखेड येथील राहिवासी गुरु भक्तराज साधु जानराव देशमुख ह्यांच्या एक तपाच्या परिश्रमानें श्रीपातालेश्वराच्या जीर्णोद्धार होऊन ह्या पवित्र स्थानाचा महिमा वाढण्यास सुरवात झाली. असा उल्लेख माधवराव नारायणराव पाटणकर यवतमाळ यांच्या द्वारे १९१३ साली लिखित पाताळेश्वर- जीर्णोद्धार या पुस्तकांत आढळून येतो.

गायमुख नावानेच प्रसिद्ध आहे शिवमंदिर : पूर्वीपासून फक्त गायमुख या नावाने हे स्थान प्रसिद्ध आहे. श्री महादेवाला एका पैचेंही उत्पन्न नसल्यामुळे श्रीची पूजा-अर्चा, नंदादीप, नैवेद्य वगैरे यथासांग चालण्यास काहीच साधन नाही, हे पाहून जानरावाचा जीव रात्रंदिवस तळमळू लागला होता. सुदैवाने मागील वर्षी धामणगावला माझी व साधुबाबांची भेट झाली आणि त्यांनी मला या पवित्र क्षेत्रा विषयी सांगितल्यानंतर प्रत्यक्ष भेट दिली असता, अवलोकन केल्याबरोबर मला इतका काहीं आनंद झाला की, त्याचे वर्णन करणे शब्दाबाहेरचे असल्याचा उल्लेख या पुस्तकात आढळतो.

हेही वाचा : Shani Mandir In Beed : शनीचे साडेतीन पिठांपैकी अर्धपीठ बीड जिल्ह्यात, असा आहे इतिहास...

Last Updated : Mar 13, 2023, 8:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.