ETV Bharat / state

जडीबुटी विक्रेते कुटुंबीय अर्ध्या प्रवासातून अंजनगावात परतले, बस स्थानकात जागून काढली रात्र - अंजनगावसुर्जी जडीबुटी विक्रेते न्युज

जडीबुडी विक्री करणारे हे कुटुंब मूळचे चाळीसगावचे आहे. मात्र, सद्यस्थितीत कारंजा घाडगे येथील रहिवासी आहेत. ते गावागावात पाल मांडून जडीबुटी विकून आपला उदरनिर्वाह चालवितात. त्यासाठी हे सहा कुटुंब कारला गावात पाल मांडून राहत होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाले आणि त्यांचा व्यवसाय ठप्प झाला.

anjangaon surji  anjangaon surji amravati news  amravati latest news  अंजनगावसुर्जी जडीबुटी विक्रेते न्युज  अंजनगावसुर्जी लेटेस्ट न्युज
जडीबुटी विक्रेते कुटुंबीय अर्ध्या प्रवासातून अंजनगावात परतले, बस स्थानकात जागून काढली रात्र
author img

By

Published : May 2, 2020, 9:55 AM IST

अमरावती - जिल्ह्यातील अंजनगावसुर्जी तालुक्यातील कारला गावात पाल मांडून जडीबुटी विक्री करणाऱ्या कुटुंब लॉकडाऊन असल्याने मंगळवारी आपल्या गावी जाण्यासाठी निघाले. मात्र, पोलिसांनी अडवल्याने अर्ध्या प्रवासातून परत अंजनगावसुर्जीमध्ये येवून बसस्थानकातील अंधारात राहण्याची वेळ त्यांच्यावर आली.

जडीबुडी विक्री करणारे हे कुटुंब मूळचे चाळीसगावचे आहे. मात्र, सद्यस्थितीत कारंजा घाडगे येथील रहिवासी आहेत. ते गावागावात पाल मांडून जडीबुटी विकून आपला उदरनिर्वाह चालवितात. त्यासाठी हे सहा कुटुंब कारला गावात पाल मांडून राहत होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाले आणि त्यांचा व्यवसाय ठप्प झाला. जवळ असलेले होते नव्हते पैसे सुद्धा संपले. शिवाय दुसरे कामधंदे नाही. त्यामुळे आता जगावे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. त्यामुळे त्या सहा कुटुंबातील २३ जणांना कारंजा घाडगे येथे जाण्याचा विचार केला. प्रशासनाला माहिती देऊन हे कुटुंब चार वाहनात बसून गावी जाण्यासाठी निघाले. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांना कारंजा घाडगे येथे जाऊ दिले नाही. ज्या ठिकाणावरून आले त्याच ठिकाणी परत जाण्यास सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर अर्ध्या प्रवासातून परत येण्याची वेळ आली.

या कुटुंबांना पोट भरण्यासाठी गावोगावी फिरावे लागत आहे. त्यात प्रवासाचा भुर्दंड बसला. पोलिसांंनी अडवल्याने ते माघारी फिरले. मंगळवारी (ता.२८) अंजनगाव बस स्थानकात पोहोचून अंधारात त्यांनी रात्र जागून काढली. सकाळी प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली तेव्हा त्यांची राहणे व खाण्यापिण्याची सोय व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

या कुटुंबाची मागणी व त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना चाळीसगाव येथे जाण्यासाठी परवानगी पास देण्यात आली. त्यांना कारंजा घाडगे येथे जायचे असताना त्यांनी रहिवासी गाव चाळीसगाव सांगितले ही त्यांची चूक झाली. परंतु, त्याची दुरुस्ती न करता ते कारंजाला जाण्यासाठी निघाले. पास मात्र चाळीसगावची असल्यामुळे त्यांच्यावर परत येण्याची वेळ आली. आता येथे त्यांची राहण्याची व जेवणाची पूर्णपणे व्यवस्था केल्या जाईल, असे तहसीलदार विश्वनाथ घुगे यांनी सांगितले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.