ETV Bharat / state

शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची मदत करा - खासदार नवनीत राणा

नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर भागातील नुकसान झालेल्या सोयाबीन व कपाशीच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

help farmer with 50 thousand per hector said navneet rana amravati
शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची मदत करा- खासदार नवनीत राणा
author img

By

Published : Oct 19, 2020, 7:18 PM IST

अमरावती - परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, तर शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.

शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची मदत करण्याची खासदार नवनीत राणा यांची मागणी

नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर भागातील नुकसान झालेल्या सोयाबीन व कपाशीच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सरसकट सर्वेक्षण करून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये, म्हणून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीचा हात द्यावा, कुठल्याच परिस्थिती मध्ये शेतकरी-शेतमजुरांची दिवाळी अंधारात जाणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या अन्यथा खासदार म्हणून आपण रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी खासदार नवनीत राणा यांनी दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.