ETV Bharat / state

अमरावती जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; जिल्हा पहिल्यांदाच अनुभवत आहे असा पावसाळा

जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासूनच सर्वदूर जोरदार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे दुष्काळाची झळ सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना व नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. मंगळवारी रात्रीपासून बरसणारा पाउस हा आता जिल्ह्यात तळ ठोकून राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

author img

By

Published : Jul 3, 2019, 4:40 PM IST

जिल्ह्यात बरसत असलेल्या पावसाचे दृष्य

अमरावती- जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासूनच सर्वदूर जोरदार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे दुष्काळाची झळ सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना व नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात १ जूनपासून आजपर्यंत एकूण १०५ मी.मि. पाऊस बरसला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक २६२.८ मी.मि. पाऊस मेळघाटात बरसला आहे. मात्र, भातकुली, दर्यापूर, चांदूरबाजार, तिवसा, वरुड, मोर्शी या तालुक्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यात बरसत असलेल्या पावसाचे दृष्य

जिल्ह्यात पावसाने यावर्षी चांगलाच दगा दिला होता. ७ जून, ९ जून, २१ जून आणि २८ जूनला पाऊस बरसला होता. मात्र, या पावसानंतर लगेच आकाश निर्ढग होऊन ऊन पडायला लागली होती. मात्र, मंगळवारी रात्री ११.४५ च्या सुमारास पावसाने बरसायला सुरुवात केली. त्यानंतर पहाटे ३ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस कोसळू लागला. आजही दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच असून एकूण १९.५ मी.मि. पावसाची नोंद झाली आहे. अमरावती तालुक्यात १ जून पासून आजपर्यंत १२४.५ मी.मि. पाऊस बरसला आहे. आजही आकाशात काळे ढग दाटून आहेत. त्यामुळे आजही पाउस येण्याची शक्यता आहे.

मेळघाटातील धारणी तालुक्यात सर्वाधिक १८० मी.मि. पाऊस कोसळला असून पर्यटनस्थळ असलेले चिखलदरा तालुक्यात १५४ मी.मि. पावसाची नोंद झाली आहे. मेळघाटात गत २४ तासात ७९ मी.मि. पाऊस कोसळला आहे. त्याच बरोबर नांदगाव खंडेश्वर तालुक्यात महिनाभरात १०४ मी.मि, भातकुली तालुक्यात ६९.३ मी.मि. व सर्वाधिक दुष्काळ सहन करणाऱ्या चांदूर रेल्वे तालुक्यात १४९ मी.मि, धामणगाव रेल्वे तालुक्यात १४१.२ मी.मि, तिवसा तालुक्यात ६८.६ मी.मि, मोर्शी तालुक्यात ७५.४ मी.मि. वरुड तालुक्यात ७३.५ मी.मि, अचलपूर तालुक्यात ११२.६ मी.मि, चांदूर बाजार तालुक्यात ८४.४ मी.मि. दर्यापूर तालुक्यात ७८.३ मी.मि. आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यात ६४.१ मी.मि एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.

यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाल्याने पेरणीला काल पर्वापासून सुरुवात झाली आहे. मात्र, शहरातील वडाळी आणि छत्री तलाव अद्यापही कोरडे असून शहरलगतच्या जंगलातील तलावही अद्याप कोरडेच आहे. मंगळवारी रात्रीपासून बरसणाऱ्या पाऊस हा आता जिल्ह्यात तळ ठोकून राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

Intro: मंगळवारी रात्रीपासून अमरावतीसह जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस कोसळतो आहे. पावसाळा लागला असे वाटरवण अमरावती जिल्हा आज पहिल्यांदा अनुभवतो आहे. दुष्काळी झळ सहन करणाऱ्या अमरावती जिल्ह्यात 1 जून पासून आज पर्यंत एकूण 105 मी. मि. पाऊस कोसळला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 262.8 मी.मि. पाऊस मेळघाटात बरसला असून भातकुली,दर्यापूर, चांदूरबाजार तिवसा, वरुड, मोर्शी या तालुक्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.

Body:अमरावती जिल्ह्यात पावसाने यावर्षी चांगलाच दगा दिला. अमरावती शहर आणि तालुक्यात मंगळवारी माध्यरात्री पहिल्यांदाच दमदार पाऊस कोसळला. 7 जून, 9 जून, 21 जून आणि 28 जूनला पाऊस बरसला. मात्र या पावसानंतर लगेच आकाश निर्भर होऊन ऊन पडले. मंगळावरी रात्री मात्र 11.45 ला बरसायला सुरुवात झाल्यावर पहाटे 3 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस कोसळला. आजही दिवसभर पावसाची रिपरिप सुरु असून आज एकूण 19.5 मी. मि. पावसाची नोंद झाली. आज आकाशात काळे ढग दाटून आहेत. अमरावती तालुक्यात 1 जून पासून आज पर्यंत 124.5 मी. मि. पाऊस बरसला आहे.
मेळघाटातील धारणी तालुक्यात सर्वाधिक 180.मी. मि. पाऊस कोसळला असून चिखलदरा तालुक्यात 154.मी. मि. पावसाची नोंद झाली असून मेळघाट गत 24 तासात 79.मी. मि. पाऊस कोसला आहे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात महिनाभरात 104.मी. मि, भातकुली तालुक्यात 69.3मी. मि. सर्वाधिक दुष्काळ सहन करणाऱ्या चांदुर रेल्वे तालुक्यात 139 मी. मि, धामणगाव रेल्वे तालुक्यात 141.2 मी. मि, तिवसा तालुक्यात 68.6 मी. मि, मोर्शी तालुक्यात 75.4 मी. मि. वरुड तालुक्यात 73.5 मी. मि, अचलपूर तालुक्यात 112.6 मी. मि, चांदुर बाजार तालुक्यात 84.4 मी. मि. दर्यापूर तालुक्यात 78.3 मी. मि. आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यात 64.1. मी. मि पावसाची नोंद झाली आहे.
यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाल्याने पेरणीला आता काल पर्वा पासून सुरुवात झाली आहे. शहरातील वडाळी आणि छत्री तलाव अद्यापही कोरडे असून शहरलगतच्या जंगलातील तलाव अद्यापही कोरडेच आहे. मंगळवारी रात्री पासून बरसणाऱ्या पावसामुळे यावर्षी पहिल्यांदा पावसाळा लागला असल्याने आता पावसाळा जिल्ह्यात तळ ठोकून राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.