अमरावती - जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून पाऊस सुरू आहे. आज जिल्ह्यातील पाऊस काहीसा थांबला असला, तरी मेळघाटात मात्र पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे, मेळघाटातील छोट्या मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मेळघाटातील सिपणा नदी सारखीच मोठी असलेली गडगा नदी हिला आज सकाळी मोठा पूर आल्याने ती दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे, नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात मागील ३ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अप्पर वर्धा धरणाबरोबरच जिल्ह्यातील ६ मोठे धरणसुद्धा भरले आहे. त्यामुळे या धरणांमधून देखील पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही मेळघाटात दमदार पाऊस झाल्याने मेळघाटाचे सौंदर्य फुलून गेले आहे.
हेही वाचा- मुसळधार पावसामुळे अप्पर वर्धा धरण १००% भरले, वर्धा नदीला पूर