अमरावती - जिल्ह्यातील अनेक भागात आज (शुक्रवारी) पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतातील सोयाबीनच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षीही या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा तोंडातील घास हिरावून घेतला आहे.
हेही वाचा - विहिरीत पडलेल्या नीलगायला वनविभागाच्या बचाव पथकाने दिले जीवनदान
शेतकऱ्यांचे नगदी पीक हे सोयाबीन आहे. दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनची कापणी करतात. आणि त्याची विक्री केल्यानंतर ते शेतकरी आपली दिवाळी साजरी करतात. मात्र, जिल्ह्यातील अनेक भागात आज दुपारी मुसळधार पावसामुने हजेरी लावल्याने सोयाबीनच्या गंज्या पावसात भिजल्या. त्यामुळे सोयाबीन उत्पादक संकटात सापडला आहे. तर योग्य हमीभाव व फारसे उत्पादन होत नसल्याने दिवाळी कशी साजरी करावी, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
हेही वाचा - अमरावतीत लाचखोर तहसीलदार व मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
तर आणखी मोठ्या प्रमाणात पाऊस आला तर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते.