अमरावती - येथील सुपरस्पेशालिटी रुग्णालयात रुग्णसेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी इतर भत्ते मिळत नसाल्याची ( Health Workers Complaint ) तक्रार केली आहे. निदान मासिक वेतन तर नियमीत द्या, अशी मागणी ( Health Workers Demand For Salary in Amravati ) करीत सोमवारी काम बंद आंदोलन केले.
चार महिन्यांपासून वेतन नाही -
सुपर स्पेशालिटी हे कोविड रुग्णालय असून कोरोनाकाळात महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. पगार झाला नसल्याने महिन्याचे सर्व गणित बिघडले आहे. कर्जाचे हफ्ते थकले आहे. मुलांच्या शिकवणीचे पैसे देणे बाकी असून कुटुंबाचे आर्थिक नियोजन बिघडले असल्याने आमच्यावर होणारा अन्याय थांबवा, अशी मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली आहे. आम्हीसुद्धा आजारी पडत असून कुटुंबतील सदस्यसुद्धा साथीच्या आजाराने त्रस्त आहेत. औषधासाठीही जवळ पैसे नसल्याची वेदना आरोग्य सेवकांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी दिलेल्या पत्रात मंडली आहे.
हेही वाचा - Planning Of Road: मेळघाटात 35 कोटीच्या निधीतून रस्त्यांच्या कामाचे नियोजन
काम बंदचा इशारा -
दर महिन्यात 5 तारखेला नियमित वेतन मिळावे, अशी आमची मागणी आहे. इतर भत्ते सुद्धा व्यवस्थित मिळायला हवे. आता आठ दिवसात तीन महिन्याचे वेतन त्वरित मिळाले नाही तर बेमुदत काम बंद करण्याचा इशारा आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिला आहे.