अमरावती: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरमध्ये निर्माण झालेल्या गोंधळामुळे सोन्याच्या किमतीत बरेच फरक जाणवले. आता अमेरिकेतील बँकांची परिस्थिती सुधारण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसात अमेरिका आपल्या व्याजदराची घोषणा करणार आहे. त्यानंतरच सोन्याचे दर निश्चित होतील. डॉलरच्या तुलनेत रुपयाची अवस्था काय राहील त्याचप्रमाणे अमेरिकेतील बँकांवर गुंतवणूकदार किती विश्वास ठेवतील यावर देखील सोन्याचे दर अवलंबून राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील बँकांची परिस्थिती आता सुधारत असल्याची माहिती असली तरी सोन्याचे दर हे भविष्यात निश्चितपणे वाढतीलच. आज गुंतवणुकदारांना आपले पैसे सोन्यामध्येच गुंतवणे फायदेशीर ठरणारे आहे असे देखील रूपराव मुंडेगावकर यांनी सांगितले.
गुढीपाडव्या सोबतच लग्नसराईची धामधूम: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर परंपरा जपत अनेक जण सोने खरेदी करतात. गुढीपाडव्याच्या पर्वावर सोन्याचे दर कितीही असले तरी दोन ग्रॅम चार ग्रॅमचे तरी दागिने अनेकजण दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे खरेदी करतातच. सध्या गुढीपाडव्यानिमित्त अनेकांनी आपल्या दागिन्यांची बुकिंग मोठ्या प्रमाणात केली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तासोबतच लग्नसराईची लगबग देखील सुरू झाली आहे. आज सोन्याचा दर 59 हजार पाचशे रुपये इतका असून खरेदी केलेल्या सोन्यावर तीन टक्के जीएसटी देखील ग्राहकांना भरावा लागतो आहे.
गुढीपाडव्याला सोने खरेदीचे महत्त्व: गुढीपाडव्याला हिंदू नववर्षाची सुरुवात होते. या मुहुर्तावर नवीन वस्तू खरेदी करणे, गुंतवणूक करणे, विशेषत: सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. यासह घरी नवीन वस्तू घेतल्या जातात. या दिवशी सोनं खरेदी केल्यास घरात चीरकाळ लक्ष्मी टिकून राहते, असे मानल्या जाते. या दिवसाला नवीन वस्तू खरेदी केल्याने किंवा गुंतवणूक केल्याने त्याचे परिणाम शुभदायी होतात, असे ज्योतिष्यशास्त्र मानते.
बाजारात विविध ऑफर्स: या दिवशी सराफा बाजारात मोठ्या ऑफर्स ग्राहकांना दिल्या जातात. काही ग्राहक स्वत:ची आवड म्हणून तर काही जण गुंतवणूक म्हणून सोने खरेदीला प्राधान्य देतात. करतात. नात्यातील गोडवा कायम राहावा यासाठीसुद्धा सोन्याची किंवा चांदीची वस्तू एकमेकांना भेट म्हणून दिली जाते. गुढीपाडव्याला तुम्ही सोने खरेदी केल्यास ती एक उत्तम गुंतवणूकसुद्धा ठरते. कदाचित पूर्वीपासून हाच विचार करून सोनं किंवा दागिने देखील खरेदी करण्याला महत्त्व दिले जात असावे. आता दागिन्यांचा ट्रेन्ड जरी बदलला तरी
डिजीटल गोल्ड गुंतवणूक: तुम्ही गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करणार असाल तर तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता. याशिवाय तुम्ही 1 ते 10 ग्रॅमच्या 24 कॅरेटचा कॉईन देखील घेऊ शकता. तुम्ही दागिने घेणार असाल तर विशेष सावधानी बाळगण्याची गरज आहे.