ETV Bharat / state

धनत्रयोदशी करा सोनेरी, अमरावतीत २४ कॅरेट सुवर्ण मिठाई, किंमत ऐकून व्हाल अवाक् - अमरावती सोनेरी भोग मिठाई बातमी

सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक मिठाई आपल्याला पाहायला मिळतात. परंतु अमरावतीतील रघुवीर मिठाईने तयार केलेल्या सात हजार रुपये किलो किमतीच्या 'सोनेरी भोग' नावाच्या मिठाईने अमरावतीकरांना अक्षरशः भुरळ घातली आहे.

gold plated sweets selling in Amravati
अमरावतीत मिळतेय सोन्याने माखलेली मिठाई; किंमत ऐकून व्हाल थक्क!
author img

By

Published : Nov 12, 2020, 2:16 PM IST

Updated : Nov 12, 2020, 6:23 PM IST

अमरावती - सण कुठलाही असो त्यात गोळधोड असतेच. आता दिवाळीसारखा सण म्हटल्यावर मिठाईला फार महत्व आहे. मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईची विक्री यादरम्यान होत असते. अमरावतीतही अशाच प्रकारच्या एका 'सोनेरी भोग' या मिठाईने शहरवासीयांना भुरळ घातली आहे. अमरावतीमधील प्रसिद्ध अशा रघुवीर मिठाईने ही सोन्याचा वर्क असलेली मिठाई तयार केली आहे. तबल सात हजार रुपये प्रति किलो एवढी या मिठाईची किंमत आहे.

ग्राहकांच्या प्रतिक्रिया
सोन्याच्या वर्खामुळे 'सोनेरी भोग' हे नाव-

दिवाळीमध्ये मिठाईला खूप महत्व आहे. सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक मिठाई आपल्याला पाहायला मिळतात. परंतु अमरावतीतील रघुवीर मिठाईने सात हजार रुपये किलोच्या भावाची 'सोनेरी भोग' नावाची अनोखी मिठाई तयार केली आहे. या मिठाईची एवढी किंमत का, तर त्याच उत्तरही त्या मिठाईच्या नावातच आहे. कारण या मिठाईवर २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा वर्ख लावण्यात आला आहे. या मिठाईत हेजलनट, पिस्ता, मामरा बदाम, केशर या पदार्थांचाही वापर करण्यात आला आहे. राजस्थानमधील कारागिरांच्या हाताने ही मिठाई बनवण्यात आली आहे. त्यामुळे या मिठाईला आता मागणी वाढू लागली आहे.

७,००० रुपयांना ४० नग

साधारणपणे बाजारात विकायला असलेल्या मिठाईची किंमत दोनशे ते पाचशे रूपये प्रति किलोपर्यत राहते. परंतु रघुवीरने तयार केलेल्या 'सोनेरी भोग' या मिठाईची किंमत ही तब्बल ७ हजार रुपये प्रति किलो एवढी आहे. एक किलो मिठाईमध्ये ४० नग येत असून प्रत्येक नगाची किंमत काढली तर ती साधारण १७५ रुपये एवढी आहे. या दुकानात एवढी महागडी मिठाई पहिल्यांदाच बनविण्यात आली आहे. या मिठाईला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

राजस्थान आणि मध्य प्रदेशातून बोलवले कारागिर

'सोनेरी भोग' ही मिठाई बनविण्याकरीत राजस्थान आणि मध्य प्रदेशातून विशेष कारागिर बोलविण्यात आले आहे. साधारणतः बाजारात मिळणारी सर्वसामान्य मिठाई ही स्थानीक कारागीर तयार करत असतात. परंतु रघुवीरने तयार केलेली ही सोनेरी भोग मिठाई राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या भोपाळ मधील कारागिरांनी बनवली आहे. त्यामुळे या मिठाईला एक राजस्थानी चव असल्याने नागरिकांना ती पसंद पडत आहे.

इतर जिल्ह्यातील लोकांनाही मिठाईचे आकर्षण

या मिठाईचे आकर्षण हे फक्त आता अमरावतीकरांनाच नसून पुणे, नागपूर, मुंबई अशा मोठ्या शहरातून मागणी सुरु झाली. तसेच रघुवीर बनवलेली ही मिठाई ना तोटा ना नफा या तत्वावर विकली जात आहे. सोनेरी भोग ही मिठाई खरेदी करणाऱ्या ग्राहकांना रघुवीर मिठाईकडून एक प्रमाणपत्र देण्यात येत आहे. सोबतच दिवाळीनिमित्त खास शुभेच्छा असलेले ग्रीटिंग कार्ड ही यात देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकही त्या प्रमाणपत्राच्या आधारे मिठाईवर विश्वास ठेवून ही मिठाई खरेदी करत आहे. त्यामुळे ही मिठाई खरेदी करण्यासाठी आता दूरवरून ग्राहक येत असून त्यांनी या मिठाईला चांगलीच पसंती दिली आहे.

अन्न औषध प्रशासनाची परवानगी
आता सोन्याचे काम असलेली मिठाई बाजारात आणण्यापूर्वी अन्न व औषध प्रशासनाची परवानगी असणे आवश्यक आहे. परंतु नविन मिठाई विकायला कुठलेच व्यवसायिक परवानगी मागत नाही. रघुविरने मात्र अन्न व औषध प्रशासनाकडे ही परवानगी मागितली असून तशी परवानगीही अन्न व औषध प्रशासाने ही मिठाई विकण्यासाठी दिली आहे. कोणतीही गोष्ट खाण्यासाठी योग्य आहे की नाही त्याची या विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत खातरजमा करण्यात येते. जर त्याची खात्री पटली तरच त्याला परवानगी देण्यात येते. या मिठाईत वापरण्यात येणाऱ्या वर्खाची माहिती घेण्यात आली. त्याननंतर ही परवानगी देण्यात आली.

रोग्यासाठी लाभदायक
सुवर्ण भस्म हा माणसाच्या जीवनाचा आधीपासूनच अविभाज्य घटक आहे. सुवर्ण भस्म हे माणसांचे आयुष्य वाढवते. कुठल्या तरी पदार्थाच्या माध्यमातून सुवर्ण भस्म हे शरीरात जात असते. आता हिवाळा सुरू झाल्याने या हे सुवर्णभस्म हे अतिशय महत्वाचे आहे. या मिठाईमधूनही सोने हे शरीरात जाते आणि तेही आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे डॉक्टर सांगतात.

विदर्भात केवळ अमरावतीत होते विक्री

विदर्भात अनेक प्रकारच्या मिठाई मिळतात. परंतु सोन्याचे वर्क असलेली ही सोनेरी भोग ही मिठाई केवळ विदर्भात आमच्याकडेच मिळत असल्याचा दावा रघुवीर मिठाईच्या संचालकांनी केला आहे. सोनेरी मिठाई असे वैशिष्ट्य असल्याने याची परिसरात मोठी चर्चा सुरु झाली आहे. काही जण तर केवळ मिठाई बघण्यासाठी दुकानात गर्दी करत आहेत. काही उत्साही नागरिक या मिठाईसोबत सेल्फी काढतानाही दिसून येत आहेत.

Last Updated : Nov 12, 2020, 6:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.