ETV Bharat / state

Ganesh Festival 2023: यंदाही गणपती बाप्पा मातीचाच, 'अशी' ओळखा मूर्ती मातीची की प्लास्टर ऑफ पॅरिसची

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2023, 10:29 PM IST

Ganesh Festival 2023: गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी आता अखेरच्या टप्प्यात आलीय. गणपती बाप्पाच्या मूर्तीवर आता मूर्तिकार अखेरचा हात फिरवत आहेत. परंतु अनेकदा प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती म्हणून प्लास्टिकची मूर्ती गणेशभक्तांना दिल्या जाते. त्यामुळं अनेकदा फसवणूक होते. या रिपोर्टमधून प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती कशी ओळखायची, ते जाणून घेवू या.

Ganesh Festival 2023
गणेशोत्सव २०२३
मूर्तीकारांची प्रतिक्रिया

अमरावती Ganesh Festival 2023 : गणपती उत्सव हा पर्यावरणपूरकच साजरा करण्याचा कल आता वाढलाय. पर्यावरणाप्रती जागृत झालेल्या गणरायाच्या भक्तांना आपला लाडका गणपती बाप्पा हा मातीचाच हवाय. अमरावती शहरातील मूर्तिकार घडविण्यावर भर देत असले, तरी सध्या अनेक ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती देखील मातीच्याच भासत आहेत. अनेक भोळे भाविक हे मातीची मूर्ती समजून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचीच पूजा करतात, अशी वास्तविकता आहे.

'अशी' ओळखायची मातीची मूर्ती : सध्या अनेकजण आपल्या घरी गणरायाची छानशी मूर्ती स्थापन करण्यासाठी ती आधीच बुक करीत आहेत. मूर्ती विक्रेते व्यावसायिक आपल्याकडे सर्वच मुर्त्या ह्या मातीच्या असल्याचं बिनधास्तपणे सांगतात. विशेष म्हणजे मातीच्या मूर्ती या महाग आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या या स्वस्त आहेत, अशा परिस्थितीत आपण खरेदी करणार ती मूर्ती मातीची की प्लास्टर ऑफ पॅरिसची, याची कल्पना नसल्यामुळं भाविकांची आर्थिक लूट करून त्यांना मातीऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती दिली जात आहे, असा प्रकार सर्रास घडतो, असे मूर्तिकार आणि माती कला संघटनेचे उपाध्यक्ष शरद उचाडे ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले.

मातीची मूर्ती लवकर विरघळते : आपली फसवणूक होऊ नये, यासाठी भाविकांनी आपल्याला आवडणाऱ्या गणरायाच्या मूर्तीला मागच्या बाजूने छिद्र आहे की नाही हे पाहायला हवंय. मातीच्या मूर्तीला मागच्या बाजूनं छिद्र केलं जातं. या छिद्रामुळं मूर्तीचं विसर्जन करताना मूर्ती पाण्यामध्ये सहज बुडून विरघळते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या लहान मूर्तीच्या मागच्या बाजूनं छिद्र करणं शक्यच नाही. त्यामुळंच ज्या मूर्तीच्या मागच्या बाजूला छिद्र असंल ती मूर्ती मातीची असल्याचं ओळखावं, असं चरण उचाडे यांनी स्पष्ट केलंय. (how to identify ganesha statue of pop soil)

वर्षभर घडतात मातीच्या मूर्ती : अमरावती शहरातील फ्रेझरपुरा परिसरात असणाऱ्या मूर्तिकारांच्या वस्तीसह राजापेठ, निभोरा परिसर आणि अंबागेटच्या आत जुन्या शहरात असणाऱ्या मूर्तिकारांच्या वस्तीमध्ये अनेक ठिकाणी बाराही महिने मातीच्या मुर्त्या (ganesha statue) घडविण्याचं काम सुरू असतं. आता गणपतीच्या मूर्ती बनवण्याचा सीझन आहे. यासाठी विविध ठिकाणावरून शाडू माती नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात येणाऱ्या सावरगाव येथून मूर्तिकार मोठ्या प्रमाणात माती खरेदी करून आणतात. सध्या आठ हजार रुपयात 80 फूट या दरानं, आम्ही शाडू माती खरेदी केलीय, अशी माहिती देखील चरण उचाडे यांनी दिलीय. मातीची एक बॅग साडेचारशे ते पाचशे रुपयात पडते. यामध्ये केवळ दोन मूर्ती घडविला जातात. आता रंगाचे दर देखील वाढले असल्यामुळं आम्हाला हवा तसा मोबदला मिळणं कठीण आहे, असं निंभोरा मूर्तीकर रामेश्वर बंसले म्हणालेत.

अमरावतीतून मुर्ती परदेशात : अमरावती शहरात मूर्ती घडविण्याच्या उद्योगाला आधुनिक रूप देणारे अतुल जिराफे यांच्याकडे तयार होणाऱ्या अतिशय सुबक आणि सुंदर मूर्ती या दरवर्षी औरंगाबाद, नाशिक या शहरांसह थेट अमेरिका आणि इंग्लंडमध्ये देखील (Ganesh Festival prepration) जातात. अमेरिका आणि इंग्लंडमध्ये मोठ्या संख्येत मराठी कुटुंब आहेत. या दोन्ही देशांमध्ये दरवर्षी गणपतीच्या मूर्ती गणेश भक्त हे स्वतः अमरावतीत जातात, असं अतुल जिराफे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलंय. जिराफे यांच्याकडे मूर्ती घडविण्याच्या कारखान्यात वर्षभर 25 ते 30 कामगार हे काम करतात. गणपती उत्सवाच्या सीझनमध्ये 40 ते 50 कामगार अतिशय सुंदर आणि सुबक मूर्ती घडवतात. आमच्याकडे पूर्वी प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये देखील काम व्हायचं. मात्र, गत आठ नऊ वर्षांपासून संपूर्ण मूर्ती या मातीपासूनच घडविल्या जातात, असं अतुल जिराफे म्हणालेत.

हेही वाचा :

  1. Ganeshotsav 2023 : गणेशोत्सव काळात उत्तर भारतीय कारागिरांची कलाकुसर
  2. Ganeshotsav Festival २०२३ : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, आजपासून मुंबई-गोवा महामार्गावर 'हा' नियम लागू
  3. Eco Friendly Ganesha Idol : पुण्यातील पेटंट मिळविणारे पहिले शिल्पकार; पेटंटला दिले 'रवींद्र मिश्रण' नाव...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.