ETV Bharat / state

मोझरी ते सेवाग्राम या 'राष्ट्रसंत ते राष्ट्रपिता' गांधी संकल्प पदयात्रेला आजपासून सुरुवात - dr vikas mahatme

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोझरी येथील कर्मभूमीतून गांधी विचारांचा प्रसार करण्यासाठी राष्ट्रसंत ते राष्ट्रपिता या गांधी संकल्प पदयात्रेला आजपासून सुरुवात झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन घेऊन या पदयात्रेची सुरुवात झाली असून याचा समारोप वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे होणार आहे.

मोझरी ते सेवाग्राम या 'राष्ट्रसंत ते राष्ट्रपिता' गांधी संकल्प पदयात्रेला आजपासून सुरुवात

author img

By

Published : Jan 15, 2020, 5:25 PM IST

अमरावती - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोझरी येथील आश्रमातून महात्मा गांधींच्या वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमपर्यंतच्या गांधी संकल्प पदयात्रेला आज(बुधवार) सुरुवात झाली. ४ रात्र आणि ५ दिवस असा हा प्रवास सुरू राहणार असून राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या या यात्रेला केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी हिरवा झेंडा दाखवला.

'राष्ट्रसंत ते राष्ट्रपिता गांधी संकल्प पदयात्रेला आजपसून सुरुवात

देशाला ग्रामगीतेतून ग्रामस्वराज्याचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोझरी येथील कर्मभूमीतून गांधी विचारांचा प्रसार करण्यासाठी 'राष्ट्रसंत ते राष्ट्रपिता' ही 'गांधी संकल्प पदयात्रा' आज(बुधवार)पासून सुरू झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन घेऊन या पदयात्रेची सुरुवात झाली असून याचा समारोप वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे होणार आहे. राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, तर केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. या पदयात्रेचा प्रवास हा ४ रात्र आणि ५ दिवसांचा असणार आहे.

हेही वाचा - अमरावती : तळेगावात संतप्त शेतकऱ्यांचा पाटबंधारे अधिकाऱ्यांना घेराव

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी दिलेल्या या मूल्यांचे जतन आणि संर्वधन करताना ते आपल्या अंगी रुजावेत यासाठी ही पदयात्रा काढण्यात आली आहे. या पदयात्रेच्या अनुषंगाने गावागावात स्वच्छता, शेतकरी उत्पन्न वाढविण्याचे विविध पर्याय यावर चिंतन होणार आहे. गांधीजींची तत्वे सोप्या तऱ्हेने आत्मसात करणे हे या पदयात्रेचे उद्देश्य आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा या दोन व्यक्तींनी विदर्भाला आणि या देशाला राष्ट्रीयतेचे महत्व शिकविले. म्हणून या पदयात्रेची सुरुवात या महान संताच्या मोझरी या कर्मभूमीतून करण्यात आली. महात्मा गांधीच्या निवासाने पावन झालेल्या सेवाग्रामला याचा समारोप होणार आहे. तत्पूर्वी मोझरीत सभा घेऊन या यात्रेची रूपरेषा सांगण्यात आली. वृक्षरोपण करून यात्रेला प्रारंभ करण्यात आला.

हेही वाचा - गृहमंत्री अनिल देशमुख करणार मूकबधिर 'वर्षा'चे कन्यादान

Intro:अमरावती:राष्ट्रसंत ते राष्ट्रपिता गांधी संकल्प यात्रा
मोझरी ते सेवाग्राम पदयात्रेला प्रारंभ,

केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी दाखवली हिरवी झेंडी.

अमरावती अँकर
:-देशाला ग्रामगीतेतून ग्रामस्वराज्याचा संदेश देणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोझरी येथील कर्मभूमीतून गांधीविचाराचा प्रसार करण्यासाठी राष्ट्रसंत ते राष्ट्रपिता ही गांधी संकल्प पदयात्रा तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन घेऊन आजपासून सुरू झाली आहे,याचा समारोप वर्धा जिल्हातील सेवाग्राम येथे होणार आहे,४रात्र व५दिवस असा हा प्रवास सुरू राहणार असून राज्य सभेचे खासदार डॉ विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या या यात्रेला केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी हिरवी झेंडी दाखवली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती च्या निमित्ताने त्यांनी दिलेल्या या मूल्यांची जपवणुक आणी सर्वधन करतानाचे आपल्या अंगी ही मूल्य रुजीवाता यावीत म्हणून ही पदयात्रा काढण्यात आली आहे .या पदयात्रेच्या अनुषंगाने गावा गावात स्वच्छता शेतकरी उत्पन्न वाढविण्याचे विविध पर्याय यावर चिंतन होणार आहे.गांधीजीची तत्वे सोप्या तऱ्हेने आत्मसात करणे ज्या दोन व्यक्तीनी विदर्भाला व या देशाला शिकविले ते म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा म्हणून या पदयात्रेची सुरवात या महान संताच्या भूमीतुन मोझरी येथून सुरू झाली यावेळी केंद्रीय राज्य मंत्री मनसुख मंडविया उपस्थित होते तर या पदयात्राचे आयोजन खासदार विकास महात्मे यांनी केले आहे, महात्मा गांधीच्या निवासाने पावन झालेल्या सेवाग्रामला याचा समारोप होणार आहे तत्पूर्वी मोझरीत सभा घेऊन याची रूपरेषा सांगण्यात आली तर तिरंगा झेंडे सर्वत्र दिसत होते वृक्षरोपण करून यात्रेला प्रारंभ झाला

बाईट-मनसुख मांडवीया,केंद्रीय राज्यमंत्री
बाईट-विकास महात्मे,खासदारBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.