ETV Bharat / state

Gajanan Maharaj Prakatdin 2023 : 'गण गण गणात बोते'च्या नामघोषाने दुमदुमली अमरावती नगरी, प्रगट दिनाचा उत्साह

श्री संत गजानन महाराजांचा 145 वा प्रकटदिन, आज सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केल्या जात आहे. अमरावती शहरात देखील विविध परिसरातील गजानन मंदिरात श्री संत गजानन महाराजांचा 145 वा प्रकटदिन साजरा केल्या जात आहे.

Gajanan Maharaj Prakatdin 2023
गण गण गणात बोते च्या नामघोषाने दुमदुमली अमरावती
author img

By

Published : Feb 13, 2023, 6:08 PM IST

अमरावतीत प्रगट दिन सोहळ्यात खा. नवनीत राणा सहभागी

अमरावती : लाखो भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या 'संत श्री गजानन महाराज' यांच्या प्रगट दिन उत्सवानिमित्त अमरावती शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिरात उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वच मंदिरात भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केलेली आहे. रेल्वे स्थानक परिसरातील श्री संत गजानन महाराज मंदिर येथे प्रकट दिनानिमित्त सर्वाधिक गर्दी उसळली असून; या ठिकाणी महाप्रसादानिमित्य खापर्डे बगीचाच्या दिशेने जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. मंदिर असणाऱ्या शहरातील सर्वच परिसरात अतिशय आनंदाचे वातावरण आहे.

गजानन महाराज प्रकटदिन इतिहास : माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण होते, अशी दंतकथा आहे. बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने 'आंध्रा योगुलु' नावाच्या पुस्तकात गजानन महाराज तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे. 'गण गण गणात बोते'चा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येतो आहे. यंदा 13 फेब्रुवारी 2023 सोमवार रोजी श्री संत गजानन महाराजांचा 145 वा प्रकटदिन महाराष्ट्रासह अख्ख्या देशभरात प्रचंड उत्साहात साजरा केल्या जात आहे.

ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन : अमरावती शहरातील सर्वच श्री संत गजानन महाराज मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यासह श्री संत गजानन महाराजांच्या अनेक भक्तांच्या घरी देखील महाप्रसादाचा लाभ भाविक घेत आहेत. अमरावती शहरातील प्रभात कॉलनी, स्वस्तिक नगर, न्यू गणेश कॉलनी, गांधी चौक, रुक्मिणी नगर, रेवसा, वडाळी या भागातील श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली असून; या ठिकाणी शेकडो भाविकांना महाप्रसादाचे वितरण केले जात आहे.

भाकरीचा प्रसाद : लोकमान्य टिळक यांनी गजानन महाराजांची भेट घेतली होती. अकोल्यात शिवजयंतीनिमित्त झालेल्या एका सभेला, टिळकांबरोबर गजानन महाराजही व्यासपीठावर बसले होते. लोकमान्य टिळकांना कैद झाली, त्यावेळी महाराजांनी त्यांच्याकरिता भाकरीचा प्रसाद पाठविला होता. आजही भाविक प्रकट दिनाला झुणका -भाकरीचा प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवितात आणि त्याचाच महाप्रसाद वाटप करतात.

खासदार नवनीत राणा यांनी केले श्रीं चे पूजन : श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शहरातील सरस्वती नगर आणि केडिया नगर येथील श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी श्रींचे पूजन केले. सरस्वती नगर परिसरात संत गाडगेबाबा यांच्या पालखीत देखील खासदार नवनीत राणा सहभागी झाल्या.

हेही वाचा : Gajanan Maharaj Prakatdin 2023 : यंदा श्री संत गजानन महाराजांचा 145 वा प्रकटदिन; धुमधडाक्यात होणार साजरा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.