ETV Bharat / state

भाजीपाल्याच्या दरात आणखीन घसरण; शेतकरी पुन्हा संकटात - अमरावती भाजीपाला दर

एक ते दीड महिन्यांपूर्वी राज्यात भाजीपाल्याच्या ( Vegetable Price ) दरात मोठी वाढ झाली होती. कोथिंबीरने शंभरी गाठली होती. पण उत्पादनच नसल्याने शेतकऱ्यांना त्या भावांचा फायदा झाला नाही. परंतू आता मागील आठ दिवसांत अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाजीपाल्याचे दर प्रचंड कमी झाले आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

farmer
शेतकरी
author img

By

Published : Dec 1, 2021, 10:45 AM IST

अमरावती - पेट्रोल सिलेंडर डीझलचे व जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असताना, मात्र भाजीपाल्याचे ( Vegetable Price ) दर अचानक घसरल्याने शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. कारण, एक ते दीड महिन्यांपूर्वी शंभर ते दिडशे रुपये किलोपर्यंत विकली जाणाऱ्या कोथिंबीरचे दर मात्र आता प्रचंड कोसळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Amravati Agricultural Produce Market Committee )आपली कोथिंबीर केवळ 10 ते 15 रूपये किलोपर्यंत विकावी लागत आहे. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. हिवाळ्याच्या ऋतूत बाजारपेठेत भाजीपाल्याची प्रचंड आवक वाढल्याचे टमाटर, आलू कांदा वगळता तर सर्वच भाजीपाल्याचे दरही मोठया प्रमाणात कमी झाल्याच शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे म्हणने आहे.

अमरावतीमध्ये भाजीपाल्याचे दर प्रचंड कमी झाले आहेत.
एक ते दीड महिन्यांपूर्वी राज्यात भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. कोथिंबीरने शंभरी गाठली होती. पण उत्पादनच नसल्याने शेतकऱ्यांना त्या भावांचा फायदा झाला नाही. परंतू आता मागील आठ दिवसांत अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाजीपाल्याचे दर प्रचंड कमी झाले आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. एकीकडे उत्पादन खर्च, त्यात मजुरी, मात्र दर मिळत नसल्याने लागवडीसाठी लागलेला खर्च ही निघत नसल्याच शेतकऱ्यांचे म्हणने आहे.

म्हणून पालेभाज्या झाल्या स्वस्त -

हिवाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांकडून रब्बीची पेरणी तसेच भाजीपाल्यांची पेरणीही मोठ्या प्रमाणात होते. यंदा अतिपावसामुळे विहिरी, कुपनलिकांना पाणी जास्त असल्याने शेतकरी भाजीपालावर्गीय पिकाकडे वळले आहेत. बाजारात सद्यस्थितीत हिरव्या भाजीपाल्याची आवक जास्त आहे तसेच पेरणी क्षेत्रही जास्त आहे. ग्रामीण भागातून हिरव्या भाजीपाल्याची बाजारात आवक वाढल्याने पालेभाज्याचे दर स्वस्त झाल्याचे व्यापारी संदीप काळे यांनी सांगितले.

पालेभाज्या खा, आरोग्य जपा -

हिवाळ्याच्या दिवसामध्ये जेवणात पालेभाज्यांना खूप महत्त्व आहे. पालेभाज्यांमुळे आरोग्य निरोगी राहते तसेच अनेक पालेभाज्या रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात. अशाच काही भाज्या या आरोग्यदायी आहेत.
पालक शरिरातील पचनसंस्थेसाठी उपयुक्त असून, दमा आणि खोकला कमी करणारी ही भाजी आहे. त्यामुळे पालक दररोज खाणे गरजेचे आहे. तसेच मेथीत लोहाचे प्रमाण जास्त असल्याने ती यातहारक व शक्तिकारक असते. त्यामुळे ती खाणे गरजेचे आहे. तसेच विविध पालेभाज्यामध्ये विविध जीवनसत्व असल्याने त्या शरिरासाठी उपयुक्त आहेत.

ठोक बाजारपेठेतील दर -

कोबी -12-15
हिरवे कांदे -15-20
मेथी -15-20
पालक - 5
निंब - 20
संभर - 10-12
टमाटर - 50-55
वाटाने - 35

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.