अमरावती - जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघातील रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आठ रुग्णवाहिका दिल्या आहेत. या रुग्णवाहिका पूर्णपणे मोफत असून रुग्णांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही आहे. तर या रुग्णवाहिकांसाठी लागणारे सर्व डिझेल रिलायन्स कंपनी मोफत देणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले आहे. पुढील तीन महिने ही सेवा चालू राहणार आहे. या रुग्णवाहिका सर्वांना मोफत कोणत्याही रुग्णालयात दाखल करण्यासाठी सेवा देणार आहेत. असेही कडू यांनी सांगितले.
कल्याण मंडप येथे ७५ खाटाचे कोविड सेंटर -
अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता अनेक ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले जात आहे. त्याच धर्तीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून अचलपूर शहरातील कल्याण मंडप येथे ७५ खाटाचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. ऑक्सिजन वगळता सर्व वैद्यकीय सुविधा या सेंटरमध्ये रुग्णांना दिल्या जाणार आहे.
कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टरांनी सेवा द्यावी -
अचलपूरमध्ये उभारण्यात आलेल्या या कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टरांनी सेवा द्यावी. मी पण या सेंटरमध्ये सेवा देणार असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.
बुध्द जयंतीला चांदुर बाजार येथे सुरू करणार कोविड केअर सेंटर -
ज्याप्रमाणे अचलपूर येथील गरज लक्षात घेता कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. त्याच धर्तीवर बुद्ध जयंतीला देखील चांदुर बाजार येथे असेच कोविड केअर सेंटर उभारणार असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले आहे.